एका माणसाला नेहमी संकटांनी वेढलेलं असतं. संकटांचा सामना करता करता त्यांचा संयम एक दिवस संपला. त्याने शहर सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्याचे नशीब बदलेल व तो सुखाने जगू शकेल, असे त्याला वाटले.
तो शहर सोडण्याच्या तयारीला लागला. शहरापासून काही दूर एक जागा शोधली व तिथे जाण्यासाठी तो सामान घेऊन निघाला. तेव्हा त्याला घराबाहेर एक बाई उभी असलेली दिसली. त्याने विचारलं, काय हवं आहे? ती म्हणाली तुझी सोबत. तो म्हणाला पण मी तर आता शहर सोडून निघालो आहे. ती म्हणाली, तर काय झालं? तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या सोबत येईन. त्याने विचारलं पण तू कोण आहेस?
ती बाई म्हणाली, तुझंं नशीब. तो म्हणाला जर तूच माझी साथ सोडायला तयार नाही, मी दुसर्या शहरात जाऊन करू तरी काय? त्याने तिथेच राहून नशीब बदलण्याचा निर्णय घेतला. तो मन लावून मेहनत करू लागला. काही दिवसांनी त्याचं नशीब बदललं.
एक दिवस तीच बाई त्याला भेटली व म्हणाली, जागा बदलून नशीब बदलत नसते.
त्यापेक्षा परमेश्वला शरण जा. संकटांचा सामना करण्यासाठी परमेश्वराकडे बळ मागा, हिंमत मागा. परमेश्वर नशीब बदलवणार नाही, पण तुम्हाला संकटाशी सामना करण्याचं बळ नक्की देईल.