धार्मिक

सदगुरुंनी सांगितलं हेल्दी आणि दीर्घायुष्याचं रहस्य ! फक्त 6 सूत्र, लाइफ होईल सुखी


मॉडर्न लाइफ आजार आणि अडचणींनी भरलेली असते. शारीरिक आजार तर असतातच, मानसिक आजारही खूप आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रस्त असतो. सदगुरु जग्गी वासुदेव यांच्या मदते यासाठी आपण स्वतःहाच जास्त जबाबदार असतो.

आपण आपल्या जीवना प्रति समग्र दृष्टीकोण स्विकारला तर सहज आपलं आयुष्य हे हेल्दी होऊ शकतं आणि आपण सदैव खुश राहू शकतो. सदगुरु जग्गी वासुदेव म्हणाले की, आपण जीवनात फक्त 6 सूत्र अवलंबले तर आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने खुश राहू शकतो. चला जाणून घेऊया ही 6 सूत्र कोणती आहेत.

सदगुरुचे 6 सूत्र
नैसर्गिक पदार्थ
टीओआयच्या रिपोर्टमध्ये सदगुरु यांनी सांगितलं की, तुम्ही जेवढे नैसर्गिक पदार्थ खाल तेवढे जास्त हेल्दी राहाल. या नैसर्गिक गोष्टी आपण जेवढ्या रिफाइंड किंवा प्रोसेस्ड करुन घाऊ तेवढे अनहेल्दी राहू. यामुळे नेहमी संपूर्ण अन्न, ताजी फळं, सीड्स, हिरव्या पालेभाज्या हलक्या शिजवून खाव्यात. प्रोसेस्ड, रिफाइंड, फास्ट फूड, जंक फूड इत्यादींचं सेवन करु नये. यामुळे आजार होतील. नैसर्गिक पदार्थांनी बॉडी डिटॉक्सिफाय होईल आणि आजार होणार नाहीत.

2. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी
हेल्दी लाइफ जगण्यासाठी सदगुरुंनुसार फिजिकल एक्सरसाइज खूप गरजेची आहे. त्यांनी सांगितलं की, नियमित योगा किंवा इतर प्रकारच्या एक्सरसाइज केल्याने तुम्ही आजारी पडणार नाहीत. यामुळे बॉडी, माइंड आणि चित्त बॅलेन्स राहील. जीवनात आनंद मिळेल. तसंच हार्ट हेल्थ आणि वजन नियंत्रित राहील. सदगुरु म्हणतात की, योगामध्ये सूर्य नमस्कार नियमित करा. यामुळे मन आणि चित्त प्रसन्न राहील.

3.परिपूर्ण झोप
सदगुरु म्हणतात की, दीर्घायुष्य आणि हेल्दी लाइफसाठी भरपूर झोप खूप आवश्यक आहे. सदगुरुंनी यासाठी लवकर झोपणे आणि लवकर उठण्याचा सल्ला दिलाय. त्यांनी सांगितलं की, जास्त उशीरापर्यंत झोपण्याच्या तुलनेत जास्त गुणवत्ता असणारी झोप आवश्यक आहे. ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकते. तुम्ही गुणवत्ता असलेली झोप म्हणजेच गाढ झोप घेतली तर याचा फायदा खूप जास्त होतो.

4. मेडिटेशन
हेल्दी लाइफ आणि दीर्घायुष्यासाठी जीवनात ध्यान खूप गरजेचे आहे. सदगुरु सांगतात की, मेडिटेशनने प्रत्येक प्रकारची क्रोनिक कंडीशनपासून सुटका मिळवता येते. यामुळे स्ट्रेस, एंग्जाइटी आणि डिप्रेशनची समस्या दूर होऊ शकते.

5. आनंद घ्या
सदगुरु यांच्यानुसार हेल्दी लाइफसाठी नेहमी सकारात्मक दृष्टीकोण अवलंबला पाहिजे. यासाठी प्रत्येक प्रकारच्या प्रसंगात आनंद शोधला पाहिजे. प्रत्येक गोष्टी प्रति सकारात्मक भावना ठेवायला हवी. सकारात्मक दृष्टीकोण आणि भावनात्मक संबंध हे सुखी जीवनाचं रहस्य आहे.

6. निसर्गासोबत जोडले जा
सदगुरु म्हणतात की, निसर्गासोबत जोडले जाणे हे दीर्घायुष्य आणि हेल्दी लाइफचं महत्त्वपूर्ण सूत्र आहे. तुम्ही निसर्गाजवळ जास्त वेळ घालवला तर यामुळे तुम्हाला आंतरिक आनंद मिळेल. ज्यामुळे चित्तला शांती आणि आंतरिक शांती मिळेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *