धार्मिक

फक्त एका मंत्रात संपूर्ण विष्णू सहस्रनामची शक्ती; म्हणाल तर बदलेल तुमचं आयुष्य


संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठण करण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तेवढं काही कारणांनी शक्य होत नसेल तर आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही संपूर्ण विष्णू सहस्रनामाचा लाभ एका श्लोकातून घेऊ शकता.

जसं संपूर्ण विष्णू सहस्रनाम वाचणं फलदायी आहे त्याच पद्धतीनं तुम्ही या मंत्राचा जप केलात तर तुम्हाला मिळणारे फायदे जास्त आहेत.

विष्णू सहस्रनामाचं मनोभावे नित्यनियमाने पठण करणाऱ्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. यासोबतच धनधान्य, सुख-संपदा आणि समृद्धी कायम टिकून राहते. श्रीहरिची 1000 नावं यामध्ये दिलेली आहेत. त्यांचा महिमा या सहस्रनामात सांगितला आहे. त्यातील एका श्लोकाचं पठण केलं तर पुण्यप्राप्त होतं असं सांगितलं जातं.

 

श्री राम रामेति रामेति रामे रामे मनोरमे
राम रामेति रामेति रामे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने।

 

अर्थ : शिवजी माता पार्वतीला सांगतात की मुखात श्रीरामाचे नाव असल्याने राम राम राम या बारा अक्षराचा जप कर. हे पार्वती ! मीही या रामाच्या नावाचा जप करण्याचा आनंद घेतोय. राम हे नाव भगवान विष्णूच्या सहस्रनामाशी समतुल्य आहे. भगवान रामाचे ‘राम’ हे नाव विष्णु सहस्रनामाच्या समतुल्य असल्याचे म्हटले आहे. या मंत्राला श्री राम तारक मंत्र असेही म्हणतात. त्याचा जप संपूर्ण विष्णु सहस्रनाम किंवा विष्णूच्या 1000 नावांचा जप करण्यासारखा आहे.

विष्णू सहस्रनामाचं पठण करताना पिवळी वस्त्र परिधान करायला हवीत असं सांगितलं जातं. भगवान विष्णूची पूजा करताना गूळ, हरभरा किंवा पिवळी मिठाई अर्पण करावी. गुरुवारी संध्याकाळी मीठ इत्यादींचे सेवन करू नये. रोज विष्णुसहस्त्रनाम पठण करणाऱ्याने नेहमी सात्विक भोजन करावे.

इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. नवगण न्यूज 24 मराठी या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *