एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केलीय का की हिंदू देवतांची बहुतेक मंदिरे हे डोंगरावर वसलेले आहे. काही क्वचितच मंदिरं सोडली तर बहुतांश प्रचिलित आणि महत्वाची मंदिरे ही डोंगरावर असतात.
मग ते जम्मूतील माता वैष्णोदेवीचे मंदिर असो, किंवा गुवाहाटीतील माँ कामाख्याचे मंदिर असो, किंवा हरिद्वारमधील मनसा मातेचे मंदिर असो किंवा बनासकांठामधील कालिका मातेचे मंदिर असो. सगळेच मंदिरं हे डोंगरावरच वसलेले आहे.
पण मग प्रश्न असा की सर्व देवदेवतांची मंदिरे डोंगरावर असण्याचे कारण काय? चला जाणून घेऊ.
विश्वाच्या मूळ सृष्टीचे वर्णन वेद आणि पुराणात केले आहे. ही पृथ्वी पाच तत्वांनी बनलेली आहे आणि ती पाच तत्वांमध्येच विलीन होईल. ही पाच तत्वे म्हणजे जल, वायू, अग्नी, जमीन आणि आकाश.
वेद आणि पुराणानुसार या पाच तत्वांचे पाच देव आहेत. भूमीची देवता शिव, हवेची देवता विष्णू, पाण्याची देवता गणेश, अग्नीची देवता अग्निदेव आणि आकाशाची देवता सूर्य आहे. माता दुर्गा हिला शक्तीचे रूप देखील म्हटले जाते. या सर्वांमध्ये शक्ती सर्वोच्च मानली जाते. पर्वतांना पृथ्वीचा मुकुट आणि सिंहासन असेही म्हणतात. म्हणूनच बहुतेक देवींची स्थाने डोंगरावर आहेत.
हे देखील एक कारण मानले जाते
उंच पर्वतांवर देवी-देवतांची मंदिरे असण्यामागील कारण असे मानले जाते की, प्राचीन काळी ऋषी-मुनींना शंका होती की त्यांच्याकडे जी काही सपाट जमीन असेल ती मानव वापरतील आणि कुठेही एकटेपणा राहणार नाही. त्यात नामस्मरण, तप आणि चिंतनासाठी एकांत अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत पर्वतांना देवीचे स्थान बनवणे योग्य मानले गेले. आणि उंच डोंगरावरील वातावरणही शुद्ध असते. त्यामुळे त्याच वेळी तिथे जाऊन सकारात्मकतेचा अनुभव येतो. त्यामुळे देवींची स्थाने डोंगरावर आहेत.
यामागे आणखी एक कारण म्हणजे… माता सतीला जेव्हा शंकर भगवान कैलासावर घेऊन जात होते, तेव्हा तिच्या शरीराचे काही भाग खाली पडले, जिथे देविचं अंश राहिलं जिथे ही मंदिरं बांधली गेली. उंच ठिकाणावरुन गेल्यामुळे देविचे हे अंश डोंगरांवरच पडले. ज्यामुळे मंदिरं उंच डोंगरावर बांधली गेली.