क्राईम

दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी

दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी


दुहेरी हत्याकांडातील आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर शाही मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये घडला. याप्रकरणी शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी असलेल्या माजी महापौर संदीप कोतकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २०१८मध्ये अहिल्यानगर शहरात दुहेरी हत्याकांडाची भयंकर घटना घडली होती. अहिल्यानगर महापालिकेच्या निकाला दरम्यान शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घृणपणे गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या दुहेरीा हत्यांसह लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप कोतकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच संदीप कोतकर जामिनावर बाहेर आला होता.

 

त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा गुंडगिरीचे वर्तन दाखवले. न्यायालयातून जामीन घेऊन बाहेर येताच संदीप कोतकर सह त्याच्या समर्थकांनी नगरमध्ये फटाक्यांची जंगी मिरवणूक काढली. धक्कादायक म्हणजे खून केलेल्या शिवसैनिकांच्या घरासमोर जाऊन त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी केली. मयत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि घरासमोर गोंधळ घातल्या प्रकरणी माजी महापौर संदीप कोतकरवर नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, येरवडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी पकडलेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी निखिल कांबळे हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नजर चुकवून ससून रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीवेळी २१ ऑक्टोबर रोजी फरार झाला होता. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस कर्मचारी सुशांत भोसले,विठ्ठल घुले व सुरज ओंबासे या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आरोपी निखील कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *