क्राईम

आधी वडील, मग भाऊ., बापाकडून रोज रात्री पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, कंटाळून पीडितेने …


मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि पती विभक्त झाल्यानंतर एकाच कुटुंबाक वडिल, मुलगी आणि भाऊ असे राहत होते.

मात्र काही महिनानंतर वासनेच्या पोटी जन्मदात्या बापाकडून मुलीवर रोज रात्री लैंगिक अत्याचार केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी मदतीसाठी भावाकडे गेली, पण भावाने देखील त्याची क्रूरता दाखली.

 

मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील पोलिसांनी 15 वर्षीय मुलीच्या वडिलांना आणि तिच्या सख्या भावाला लैंगिक अत्याचाऱ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. वडील आणि भावाने तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. एवढेच नाही तर भावाने तिचा अश्लिल व्हिडिओही बनवला. त्याचवेळी हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील या पीडितेला देण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

 

मध्य प्रदेशमधील पीडितेच्या तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. दिनारा पोलिस स्टेशनचे प्रभारी विनोद भार्गव यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबात फक्त पीडीता,तिचे वडील आणि भाऊ राहतात. ही पीडिता तिच्या आईपासून तीन वर्षांपूर्वीच विभक्त झाली होऊन ओडिशात राहत होती.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, पती पतीपासून विभक्त झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आपला वासनेचा शिकार बनवण्यास सुरुवात केली. वडिलांनी अनेकदा अत्याचार केल्याने त्रस्त झालेल्या या अल्पवयीन मुलीने आपल्या भावाला संपूर्ण हकीकत सांगितली आणि मदत मागितली. मात्र, संपूर्ण कथा ऐकल्यानंतर भावाने तिला मदत करायचं सोडून सख्या बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

 

ऐवढचं नाही तर क्रूर भावाने घटनेचा व्हिडीओ देखील केला. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील भावाने पीडितेला दिली. या घटनेनंतर पीडितेने वडिल आणि भावाच्या विरोधात पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *