पुणे: पुण्याच्या दक्षिण भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जात असून, चारही मुले एकमेकांना ओळखत नसल्याचे समोर आले आहे. या मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी व वेळी अत्याचार केले आहेत.
ओम आदेश घोलप (वय २०) व स्वप्निल विकास देवकर (वय २२) यांना अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, पिडीत मुलगी नामांकित महाविद्यालयात आकरावीच्या वर्गात शिकते. यातील एक मुलगा याच महाविद्यालयात शिकतो. तर इतर मुले दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेतात. इन्स्टाग्रामवरून पिडीत मुलीची मुलांशी ओळख झालेली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुलगी अल्पवयीन व अज्ञान असतानाही या मुलांनी तिच्याशी ओळख वाढवून व तिच्याशी संपर्क साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. महाविद्यालयातील मुलांच्या स्वच्छतागृहात तर मुलीच्या घरी तसेच घराजवळील गल्लीत अशा ठिकाणी हे अत्याचार झाले आहेत. दरम्यान, या अत्याचाराचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
अशी झाली घटना उघड
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमानिमित्ताने गेलेल्या होत्या. त्यांनी मुली व महिला अत्याचारप्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली. तसेच, तिचा व्हिडीओही असल्याचे सांगितले. नंतर महिला अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घालून गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींना अटकही केली.
हेही वाचा:Pune Crime News: नवराचं ठरला अनैतिक संबंधात ‘व्हिलन’; मग पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केली ‘अहों’ची हत्या
पत्नीकडून पतीची हत्या
अनैतिक संबंधातील अडखळा ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा गळा दाबून हत्या केली आहे. हत्येनंतर मात्र पतीने आजाराला कंटाळून स्वत:च आपले जीवन संपवले असल्याचा बनाव रचला. शवविच्छेदन अहवालानंतर हा बनाव उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तीच्या प्रियकराला अटक केली आहे. दरम्यान जबरी चोरीचा बनाव करून पतीचा प्रियकरामार्फत खून करण्याचा प्रकार नुकताच वारजेत घडला होता. दरम्यान पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे.