पुणे : पुण्यातील नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. 26 ऑगस्ट च्या दिवशी मुठा नदीमध्ये सापडलेल्या शिरा नसलेल्या मृतदेहाचा तपास करण्यास पुणे पोलीसांना यश आले आहे.
नदीत पडलेला मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा होता. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून तिची हत्या तिचा सख्खा भाऊ आणि वहिनीने मिळून केला आहे. आणि घरामध्ये धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर पुण्यात त्या दिवशी खूप पाऊस सुरु होता त्यावेळी संगमवाडी येथील नदीपात्रात मृतदेह फेकून दिले. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना देण्यात आली. त्यावेळी शेजा-यांनी सकीना गायब होण्याबद्दल संशय व्यक्त केला आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी पोलीसांनी त्वरित कारवाई करुन तपास सुरु केला.
सकीना खान ही महिला पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीत राहत होती. ती खोली सकीना खान या नावावर होती. त्यांचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांच्याशी घराच्या मालकीच्या वादातून मोठा तणाव होता. दोघांनी मिळून सकीना खानची हत्या केली आणि घरातच धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्या तुकड्यांना मुठा नदीत फेकण्यात आले.
पोलीसांनी काटेकोर तपास करुन अशपाक खान आणि हमीदा यांना अटक केली आहे. त्यांनी हत्या केलेल्या खोलीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास केला आणि हे गूढ उकलले. या प्रकरणात पुणे पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.