10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आधी जन्मदात्या पित्याने नंतर मामाने, त्रास सहन न झाल्यानं मुलीनं….
Crime News : धक्कादायक घटना बदलापूर शहरात घडली. बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या काही दिवसात अशाच प्रकारचे अनेक प्रकरण पुढे आले आहे. अशातच आता पुन्हा अकोल्यामध्ये आधी जन्मदात्या पित्याने नंतर मामाने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे समोर आले. बापाने आणि मामाने नात्याला काळिमा फासल्यामुळे अकोल्यात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
अकोल्यात जन्मदात्या पित्याने 10 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्रास सहन न झाल्याने मुलीने बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केली. ही घटना 24 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात घडली असून या 10 वर्षीय मुलीवर तिच्याचं दूरच्या नातेवाईकानं हा अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकड ठेवून आई वडील बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केलाय. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोट फैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली.
या प्रकरणाचा तपास सुरू होताच बाल न्याय मंडळासमोर पीडित मुलीचा जबाब नोंदवताना तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. आपण दुसऱ्या वर्गात शिकत असल्यापासून वडिल तिच्यावर अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने दिली. तिच्या या तक्रारनंतर वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तसेच लागलीच त्यांना अटक ही झाली आहे.. सद्यस्थितीत अत्याचार करणारे दूरचा नातेवाईक आणि वडील अटकेत आहे. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या वडील आणि मामावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरवठा करणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी केली.