क्रुरतेचा कळस! उलटे टांगून गरम चाकूने चटके देत साडे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार
पुणे : साडे चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मानसिक व शारीरिक छळ तसेच क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी सावत्र बापाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) गुन् ।हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार 5 जून ते 14 जून 2024 या कालावधीत आंबेगाव बुद्रुक येथे घडला आहे. हा प्रकार मुलीने तिच्या शिक्षकांना सांगितल्यावर उघडकीस आला आहे.
याबाबत मुलीच्या 31 वर्षीय महिला शिक्षकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुनिल राजू चौहान (वय-22 रा. रामंदिराजवळ, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376(अ)(ब), 324, 323, पोक्सो अॅक्ट, बाल न्या अधिनियम कलम 75 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिल चौहान हा पिडीत साडेचार वर्षाच्या मुलीचा सावत्र बाप आहे. मुलगी आरोपी सोबत राहते. त्याने मुलीला हाताने व बेलण्याने मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर तिच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला. तसेच चाकू गरम करुन तिच्या पृष्ठभागावर चटके देऊन तिचा छळ केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर मुलीचे दोन्ही पाय बांधून तिला उलटे टांगून तिच्या गुप्तांगावर बेलण्याने मारून क्रूर वागणूक दिली. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला.
हा प्रकार मुलीच्या महिला शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीकडे चौकशी केली. मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार फिर्यादी यांना सांगितला. त्यानंतर महिला शिक्षिकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी सावत्र बापाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नराधम बापाला अटक केली. पुढील तपास एपीआय मिथून परदेशी करीत आहेत.