पाटणा : नोकरीनिमित्त घर सोडून गेलेला एक तरुण जेव्हा घरी परतला तेव्हा त्याचं सारं जगच बदलून गेलं होतं. ज्या पत्नीवर त्याचं प्रेम होतं, ती त्याच्या लहान भावाच्या प्रेमात पडली होती. तरुणानेही काळाची गरज समजून त्यांचं नातं स्वीकारलं.
नंतर प्रमुखाच्या उपस्थितीत त्यानी पत्नीचा हात धाकट्या भावाच्या हातात दिला. हे संपूर्ण प्रकरण रोहतास जिल्ह्यातील तिलोथु येथील आहे.
महिलेचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्याची पत्नी आणि लहान भाऊ गावातील घरीच राहिले होते. पतीपासून लांब राहिल्यामुळे विवाहित महिला तिच्या दिराच्या जवळ येऊ लागली आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. नवऱ्याला याची जाणीव नव्हती. पती सुट्टीत पुन्हा घरी आला. यानंतर मध्यरात्री पतीला जाग आली तेव्हा पत्नी बेपत्ता असल्याचे दिसले.
पत्नीचा शोध घेत असतानाच तो व्यक्ती त्याच्या लहान भावापर्यंत पोहोचला. तिथे जे दिसलं ते पाहून त्याचं भान हरपलं. त्याला आपली पत्नी आपल्या लहान भावासोबत दिसली. दोघांनी एकत्र राहण्याबाबत चर्चा केली. आधी पतीने याला विरोध केला, परंतु नंतर पश्चात्ताप होईल असं कोणतंही पाऊल त्याने उचललं नाही. त्याने शहाणपणाने योग्य तो निर्णय घेतला आणि पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावलं. या प्रकरणाचा तपास करून ते संबंधित पंचायतीच्या प्रमुखाकडे सोपवण्यात आलं. यानंतर वहिनी आणि दिराचा विवाह पंचायत भवन येथे प्रमुख उमेश कुमार यांच्या उपस्थितीत पार पडला.