कधीकधी दोन लोकांमधील प्रेम अतिशय विचित्र वळणावर जाऊन पोहोचतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. यात दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने प्रेयसीने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या केली.
हत्या करण्याआधी तिने आपल्या प्रियकराचं लिंग कापलं. घडलं असं की, महिलेनं रागात आधी प्रियकराला बेडला बांधलं. नंतर त्याचं लिंग कापलं आणि मग चाकूने हल्ला करत त्याची हत्याही केली.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रेयसीला अटक केली आहे. ही घटना अमेरिकेतील कोलोरॅडो येथून समोर आली आहे. शेटिंग गुओ असं 32 वर्षीय आरोपी प्रेयसीचं नाव आहे. दुसऱ्यांदा गर्भधारणा झाल्याने गुओ चांगलीच भडकली होती. यावरुन तिचं प्रियकरासोबत भांडणही झालं. मात्र, तिचा राग शांत झाला नाही. अखेर तिने बेडला बांधून प्रियकराचं लिंग कापलं. यानंतर प्रियकर वेदननं अक्षरशः किंचाळत आणि जोरजोरात ओरडत होता.
पोलिसांना कचरापेटीत पीडित प्रियकराचं लिंग सापडलं आहे. हत्येनंतर प्रेयसीने जवळचं एक दुकान गाठलं. इथून तिने दारू, बीअर आणि काही औषधं विकत आणली. मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर तिने प्रियकराला वाचवण्याचाही प्रयत्न केला. तिने त्याला सीपीआरही दिला. मात्र, याचा काही उपयोग झाला नाही. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला.
आरोपी प्रेयसीने पोलिसांना सांगितलं, की प्रियकराला मारण्याचा तिचा उद्देश नव्हता. मात्र, आपणच त्याच्यावर चाकूने हल्ला केला असल्याचंही तिने मान्य केलं आहे. तिने सांगितलं, की दुसऱ्यांदा गर्भवती झाल्याने ती खूप रागात होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता आणि नंतर ही घटना घडली.