छत्रपती संभाजीनगर : संपत्तीसाठी ऐकमेकांच्या जीवावर उठलेली रक्ताच्या नात्यातील लोक तुम्ही पाहिले असतील. मात्र, संभाजीनगरमध्ये घडलेली बातमी वाचून तुमच्या तळपायची आग मस्तकात जाऊ शकते.
कर्जबाजारीला कंटाळलेल्या मुलानेच बापाचा खून केला. इतकेच नाही तर आईलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शहरातील सातारा परिसरातील डीलक्स पार्क येथील ही घटना असून श्रीकृष्ण पाटील (वय 62 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रोहित श्रीकृष्ण पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबातील सर्वजण सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते. यानंतर त्यांची मुलगी सकाळी आवाजाने जागी झाली तेव्हा पाटील यांचा मुलगा त्याच्या आईच्या अंगावर बसून गळा दाबत होता. मुलीने आरडाओरड करताच तो पळून गेला. यानंतर ते हॉलमध्ये श्रीकृष्ण पाटिल यांच्याकडे आले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपीला ताब्यात घेतले, तेव्हा कर्जबाजारीला कंटाळून आपनच हत्या केल्याची कबूली आरोपी रोहित याने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, आरोपीविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.