क्राईम

नवरीचा सौदा. 1.30 लाखात विकत घेतलं, लग्न केलं, पुन्हा तिला विकणार पण…


माणुसकीला लाजवणारी एक घटना घडली आहे. एका युवतीला तिच्याच भावाने शिवपुरी येथे राहणाऱ्या युवकाला 1.30 लाख रुपयात विकलं. शिवपुरी येथील युवकाच लग्न जमत नव्हतं. म्हणून त्याने लग्नासाठी युवतीला विकत घेतलं.

युवतीशी लग्न केलं. सासरी काही दिवस राहिल्यानंतर युवती माहेरी जाण्यासाठी हट्ट करु लागली. त्यावेळी तिला राजस्थानला नेऊन विकण्याचा प्लान बनवला. आरोपी तिला राजस्थानला घेऊन चाललेला. रस्त्यात पोलिसांना पाहिल्यानंतर त्या युवतीने वाचवण्यासाठी आरडा-ओरडा केला. त्यावेळी या मुलीला पोलिसांनी वाचवलं. मध्य प्रदेशच्या शिवपुरीमधील हे प्रकरण आहे. ज्या मुलीची विक्री झाली, ती छत्तीसगडची आहे.

आतून हादरवून सोडणारं हे प्रकरण कुठल्या चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. मुरैनाच्या बानमोरमध्ये बुद्धिपुरा एसएसटी चेकिंग पॉइंटवर पोलिसांनी चेकिंगसाठी एक गाडी थांबवली. कारमध्ये नवरी मुलीसह 6 जण होते. त्यावेळी मुलगी पोलिसाला म्हणाला की, ‘साहेब मला वाचवा. हे लोक माझी विक्री करण्यासाठी मला नेत आहेत’ हे ऐकताच पोलिसांनी सर्वांना कारमधून उतवरलं.

माहेरी जाण्याचा हट्ट केला

नवरी मुलीकडून सर्व प्रकरण समजून घेतलं. ती म्हणाला की, मूळची ओदिशाची आहे. मागच्या काही वर्षांपासून माझ कुटुंब छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये राहतं. काही दिवसांपूर्वी 26 मार्चला तिच्या भावाने 1.30 लाख रुपयात तिला शिवपुरीचा निवासी रवींद्र लोधीला विकलं. रवींद्रने तिच्यासोबत लग्न केलं. पण मुलीला हे नातं मंजूर नव्हतं. 10 दिवसानंतर तिने माहेरी जाण्याचा हट्ट केला.

भरतपूरमध्ये एकासोबत सौदाही ठरवला

सासरच्या मंडळींना वाटलं की, ती माहेरी गेली, तर परत येणार नाही. म्हणून त्यांनी तिला घरातच नजरकैदेत ठेवलं. तिने फोन करुन कोणाला सांगू नये, म्हणून सासरच्यांनी तिचा फोनही बंद केला. ती माहेरी जाण्यावर अडून बसली, त्यावेळी सासरच्यांना कळलं की, तिला जास्त दिवस ठेवता येऊ शकत नाही. तिला राजस्थानला नेऊन विकायच ठरवलं. भरतपूरमध्ये एकासोबत सौदाही ठरवला होता. रस्त्यात चेकिंग पोस्टमुळे हा गुन्हा उघड झाला. पोलीस या प्रकरणात चौकशी करतायत. नवरीच्या भावाला सुद्धा अटक करण्यात येईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *