क्राईम

मुलीने घरच्यांना मन हेलावणारा मेसेज करत 17 वर्षीय मुलीने कॉलेजच्या इमारतीवरुन का घेतली उडी ?


विशाखापट्टनममधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सतरा वर्षीय विद्यार्थीनीने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी टाकून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने कुटुबियांना काही मेसेज केले आहेत.

यातून ती टोकाचं पाऊल का उचलत आहे याचा खुलासा होतो. (Teen Alleges Assault Jumps Off College Building In Visakhapatnam)

विद्यार्थी आपल्या मेसेजमध्ये म्हणते की, कॉलेजमध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. मी कॉलेज प्रशासन किंवा पोलिसांकडे जाऊ शकत नाही. कारण, आरोपींकडे माझे काही फोटो आहेत. मी तक्रार केली तर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतील.

कुटुंबांना केला मेसेज

कुटुंबांना केलेल्या मेसेजमध्ये मुलगी म्हणते की, तिच्या कॉलेजमधील काही सहकाऱ्यांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. पीडिता आपल्या बहिणीला केलेल्या मेसेजमध्ये म्हणते, ‘सॉरी दीदी, मला जावं लागेल.’

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थींनी विशाखापट्टनमच्या कॉलेजमध्ये पॉलिटेकनिक करते. टोकाचं पाऊल उचलण्याआधी मुलीने आपल्या कुटुंबियांना केलेले मेसेज हृदयाला पीडा देणारे आहेत.

‘जास्त ताण घेऊ नका, मी का जात आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मी सांगितलं तरी तुम्हाला समजू शकणार नाही. आई-बाबा मला माफ करा. मला तुम्ही जन्म दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. तुम्ही मला या जगात आणलं. पण, माझा चॅप्टर आता संपत आला आहे’, असा मेसेज तिने तेलुगुमध्ये केला आहे.

चांगलं जीवन जग

पीडित विद्यार्थीनी मोठ्या बहिणीला बाळ होत असल्याने तिला शुभेच्छा देखील देते. पीडिता मेसेजमध्ये म्हणते, तू तुझ्या भविष्याकडे लक्ष ते. तुला जे वाटतं ते तू शिक. माझ्यासारखं इतर गोष्टींपासून लक्ष भटकू देऊ नकोस. दुसऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडू नको. नेहमी आनंद राहा आणि चांगलं जीवन जग.

पीडित विद्यार्थीनी आपल्या वडिलांनी केलेल्या मेसेजमध्ये सांगते, की कॉलेजमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेत. मी तक्रार करु शकत नाही. कारण, त्याचा काही फायदा होणार नाही. त्यांनी माझे फोटो घेतले आहेत. दुसऱ्या मुलींसोबत देखील असं झालं आहे. आम्ही कोणाला सांगू शकत नाही आणि कॉलेज देखील टाळू शकत नाही. आम्ही कोंडीत अडकलो आहोत.

मला जावं लागेल

मी असा टोकाचा निर्णय घेत आहे कारण, मी आता गेले तर तुम्हाला काही वर्षे वाईट वाटेल, पण काही वर्षांनी तुम्ही मला विसरुन जाल. पण, मी तुमच्या अवतीभोवती असेल तर तुम्ही माझ्याकडे पाहाल आणि तुम्हाला नेहमी वाईट वाटत राहील, असा शेवटचा मेसेज तिने वडिलांना केला आहे. त्यानंतर ती बहिणीला म्हणते की, ‘सॉरी दीदी, मी तुम्हाला खूप त्रासात टाकत आहे, पण मला जावं लागेल.’

अशा मेसेजनंतर घरच्यांनी पोलिसांना फोन करुन कळवलं, मुलीला फोन करण्याचा प्रयत्न केला. शिवाय, टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती मेसेजवरुन केली. पण, तिने प्रतिसाद दिला नाही. काही तासांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. वडील म्हणाले की, माझी मुलगी का गेली हे मला कळायला हवं. मी खूप प्रेमाने तिला वाढवलं आहे.

कॉलेजच्या प्रिन्सिपलने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या हॉस्टेलमध्ये पुरुषाला जाण्याची परवानगी नाही. वॉर्डन देखील महिला आहेत. त्यामुळे लैंगिक अत्याचार होण्याची कसलीही शक्यता नाही, असं ते म्हणाले आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *