आगळे - वेगळेक्राईम

रक्षकच भक्षक,दारूच्या नशेत पत्नी समजून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती


समाजात अनेक घटना समोर येतात त्यामध्ये रक्षकच भक्षक बनल्याचे दिसते. अशाच एका प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने नराधम पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

दोषी पित्याने अनेक वेळा आपल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिला तो धमकी देऊ लागला. इतकेच काय दोषीच्या पत्नीनेही पतीला सोडण्याची विनंती न्यायालयात केली होती.

दिल्लीतील एका न्यायालयाने नुकतेच एका व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपात जन्मठेप सुनावली आहे. दोषीला शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटले की, आरोपी मुलीला इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी पत्र लिहित होता.

आपल्या बचावात युक्तीवाद करताना दोषीने म्हटले की, तो कुटूंबात एकटाच कमावता आहे. अपराध घडला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. पत्नी आणि मुलीत त्याला फरक करता आला नाही. पत्नीनेही न्यायालयात पतीच्या बाजूने निकाल देण्याची विनंती केली होती. प्रकरणात दिल्ली महिला आयोगाच्या वकीलाने म्हटले की, आरोपीने आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केला आहे. त्याचा गुन्हा माफीलायक नाही.

न्यायालयाने पीडितेच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी १३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्याचबरोबर तुरुंग अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, दोषी द्वारे जेलमध्ये केलेल्या मजुरीतील ७० टक्के रक्कम त्याच्या कुटूंबाला व ३० टक्के रक्कम त्याच्या वैयक्तिक गरजांसाठी देण्यात यावी. डीसीडब्ल्यूच्या वकीलांनी म्हटले की, दोषीची पत्नी एका खासगी स्कूलमध्ये काम करते. प्रतिमहिना ती ५ ते ६ हजार कमावते. ही रक्कम कुटूंबाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसी नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *