क्राईम

महिलेस एकटे गाठून पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने बलत्कार


नाशिक : विवाहीतेस वेगवेगळया भागात घेऊन जात वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत हे कृत्य केले आहे. संशयिताचा अतिरेक वाढल्याने पीडित महिलेने पोलीसात धाव घेतली आहे.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलीसांनी अटक केली आहे.

शराफत अजगर अली (३७ रा.शिंदेगाव ता.जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित व पीडिता एकाच भागात राहत असून ते एकमेकांचे परिचीत आहेत. सन.२०१७ मध्ये संशयिताने महिलेस एकटे गाठून पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने बलत्कार केला होता.

त्यानंतर संशयिताने दमदाटी करीत महिलेस शिंदेगाव, नाशिकरोड व लोखंडे मळा भागात घेऊन जात वेळोवेळी हे कृत्य केले. मात्र अलिकडच्या काळात संशयिताचा अतिरेक वाढल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *