विवाहित प्रेयसीला अर्ध्या रात्री अंधारात भेटायला प्रियकर गेला गावकऱ्यांना कळल अन….
गेल्या काही वर्षांमध्ये अनैतिक संबंधांच्या घटना समोर येत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अनैतिक संबंध ठेवणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.
विवाहित प्रेयसीला अर्ध्या रात्री अंधारात भेटायला प्रियकर गेला असता गावकऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली. मग गावकऱ्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. यानंतर मोठी गर्दी झाली आणि याबाबतची सूचना 112 नंबरवर पोलिसांना दिली गेली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेमी जोडप्याला पोलीस ठाण्यात नेले.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाले आहे. 2018 मध्ये तिचे लग्न इस्लामपूर येथील तरुणाशी झाले होते. मात्र, महिलेले आपल्या पतीला खोट्या केसमध्ये अडकवले. महिलेने आपल्या पतीवर हुंडा मागत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर तरुणाने घरातून पळ काढला. त्याचदरम्यान, महिलेची फोनवर मो. कमरुल याच्यासोबत संपर्क झाला. सात महिने दोन्हीही फोनवर बोलत राहिले. यादरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंध इतके जुळले गेले की दोन्ही भेटायलाही लागले.
या महिला प्रेयसीला आपल्या प्रियकराला भेटायचे होते. त्यामुळे तिने आपल्या प्रियकराला अंधारात भेटायला बोलावले. यानंतर प्रियकर 70 किलोमीटर दूरवरुन आपल्या प्रेयसीला भेटायला रात्री अंधारात पोहोचला. यानंतर गावकऱ्यांना याबाबत माहिती झाल्यावर गावकऱ्यांना त्याला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली.
प्रियकर-प्रेयसीने काय सांगितलं –
या प्रकरणातील प्रेयसी महिला हिने सांगितले की, सात महिन्यांपासून ती तिच्या प्रियकरासोबत बोलत होती. काहीवेळा आम्ही बाहरही भेटायचो. रात्री उशिरा मी त्याला माझ्या पतीसह यायला सांगितले होते. मात्र, हा स्वत: एकटा आला. जर पतीची इच्छा असेल तर मी माझ्या प्रियकरासोबत लग्न करेन. तर प्रियकर मो. कमरुल याने सांगितले की, 7 महिन्यांपासून प्रेयसीसोबत संपर्क होता. आधी ती दुसऱ्या मुलाशी बोलायची. मात्र, आता तिने त्याला सोडले आहे. त्याच मुलापासून या प्रेयसीचा नंबर घेतला आणि यानंतर तिच्याशी मी बोलू लागलो आणि आमचे सूत जुळले.
आम्ही अनेकदा बाहेर भेटलो आहोत आणि आज रात्री तिने फोन करुन भेटायला बोलावले होते. रात्री मी पोहोचल्यावर गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे गावकऱ्यांनी दोघांना पकडले. चूक झाली आहे, मात्र आम्ही लग्न करायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस दोघांना आपल्या सोबत पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत.