पुणेःपाण्याच्या हंड्यात कुत्र्याने तोंड घातल्याने महिलने त्याच्या अंगावर पाणी टाकले. याचा राग आल्याने चार जणांनी महिलेच्या मुलाला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले.
तसेच महिलेचे केस धरुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. हा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथील दांगट वस्ती येथे मंगळवारी (दि.20) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. (Pune Hadapsar Crime)
याबाबत दांगट वस्ती येथे राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दिलीप बाबुराव जाधव (वय-66), शुभम दिलीप जाधव (वय-28), शंभो दिलीप जाधव (वय-24) शुभम जाधव याचा अनोळखी मित्रावर आयपीसी 354, 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्याद एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी यांच्या पाळीव कुत्र्याने फिर्यादी यांनी पाण्याने भरुन ठेवलेल्या हंड्यात तोंड घातले. कुत्र्याला हाकलण्यासाठी फिर्यादी यांनी कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकून कुत्र्याला बांधून ठेवा असे आरोपींना सांगितले.
याचा राग आल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करुन हाताने व दगडाने मारहाण करुन धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचे केस धरून ओढत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.