क्राईम

भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण आठ महिन्यांची गर्भवती


वाशिम : कारंजा लाड येथे भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. आतेभावानेच अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीचे बळजबरीने शारीरिक शोषण केले असून, पीडीत मुलगी 8 महिन्यांची गर्भवती आहे.

संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कारंजा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही भाऊ, वडील आणि आजीसोबत राहते. तिचा 23 वर्षीय आतेभाऊ हा मानोरा तालुक्यातील गलमगावचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त 29 मार्च 2023 पासून कारंजातच राहत होता. पीडित मुलीच्या काकासोबत तो हमालीचे काम करायचा आणि रात्रीच्या वेळी पीडितेच्या घरीच झोपायचा. एकेदिवशी त्याने रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपेत असताना पीडितेवर शारीरिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीसोबत सतत लैंगिक शोषण होत राहिले. मात्र याबाबत कुणाकडेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने मुलीला दिली. या प्रकारात पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे तिच्या लक्षात आले आणि ही बाब तिने आरोपीला सांगितली असता त्याने प्रकरणातून हात झटकण्यास सुरुवात केली.

21 डिसेंबरच्या दिवशी पीडित तरुणीच्या पोटात दुखायला लागले, या दरम्यान मुलीची आई बाहेरगावी वास्तव्याला होती. वडिलांनी मुलीच्या आईला बाहेरगावहून बोलावून घेतले. आई घरी परतताच स्वतःवर झालेला अत्याचार आणि आठ महिन्यांपासून लपवून ठेवलेला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितला. मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे ऐकताच आई-वडिलांना जबर धक्का बसला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ कारंजा शहर पोलिस स्टेशन गाठत आरोपी विरोधात रितसर तक्रार दाखल केली.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात भादंविचे कलम 376, 376(1) (एन), 376(3) सहकलम पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक करत आहेत.

जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा,छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही,छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *