क्राईम

चारित्र्यावर संशय असतानाच विवाहिता चित्रपट पाहण्यासाठी गेली अन पतीने केला पत्नीचा खून


रविवारी पहाटे खून केल्यानंतर अजयने मद्यपान करून त्याच्या दुकानात थांबला होता. दरम्यान शामलची मैत्रीण तिच्या घरी आली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अजयला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

पिंपरी: पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग तसेच चारित्र्यावर संशय असतानाच विवाहिता चित्रपट पाहण्यासाठी गेली. या कारणावरून तिचा खून केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी विवाहितेच्या पतीला अटक केली.

पिंपरीगाव येथे रविवारी (दि. १७) ही घटना उघडकीस आली. शामल बिडलान, असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती अजय मोहन बिडलान (३२, रा. सुभाषनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली. मयत शामल हिचे वडील सुजित सतपाल शिल्ले (४९, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १८) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजित शिल्ले यांची मुलगी शामल हिचा दहा वर्षांपूर्वी अजय बिडलान याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, शामल आणि पती अजय यांच्यात वाद झाले. त्यामुळे शामल हिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे अजय याला राग होता. तसेच शामल हिच्या चारित्र्यावर देखील संशय होता. या वादातून शामल गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरीगाव येथे भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत होती.

दरम्यान, शुक्रवारी (दि. १५) अजय हा शामलकडे गेला. आपण एकत्र राहू, असे म्हणत शामल हिला चित्रपटासाठी घेऊन गेला. तसेच बाहेर जेवण केले. त्यानंतर शनिवारी शामल पुन्हा मैत्रिणीसोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. आपण कालच चित्रपटाला गेलो होतो. त्यामुळे आज त्याच चित्रपटासाठी का जातेस, असे अजयने विचारले. मात्र, त्यानंतरही शामल घरातून बाहेर पडली. दरम्यान, तिची मैत्रीण घरीच असल्याचे दिसून आल्याने अजय याचा संशय बळावला.

चित्रपट पाहून रात्री घरी परतल्यानंतर शामल आणि अजय यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर रविवारी पहाटे त्याने शामल हिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास शामलने विरोध केला. याचा राग आल्याने अजयने नाक व तोंड दाबून शामलचा खून केला.

नग्न होऊन ठेकेदाराला मिठीच मारली, काय घडल?नेमकं प्रकरण काय?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *