पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केल्यानंतर हमासने आता थेट पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना टार्गेट केले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सिझेरिया शहरातील निवासस्थानावर ड्रोन हल्ला केला.
हल्ल्यावेळी नेत्यानाहू आणि त्यांचे कुटुंबिय घरी नव्हते. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्र्ाायलवर क्षेपणास्त्र्ा हल्ला केला. त्यात 1200 वर इस्त्र्ाायली नागरिकांचा मृत्यू झाला. 150 जणांना हमासने ओलिस ठेवले. एक वर्ष झाले तरी इस्त्र्ाायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी इस्त्र्ाायली लष्कराने हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केला. त्याचा बदला म्हणून हमासने नेत्यानाहू यांच्या निवासस्थानाला टार्गेट केले.
लॅबनॉनमधून ड्रोन हल्ला
इस्त्र्ाायल डिफेन्स पर्ह्सने (आयडीएफ) सांगितले की, शनिवारी लेबनॉनमधून इस्त्र्ाायलवर तीन ड्रोन उडवण्यात आले. यापैकी एक ड्रोन पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या निवासस्थानाजवळ पडले. यानंतर तेल अविवसह अनेक ठिकाणी असलेले सायरन वाजू लागले. या ड्रोन हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, लेबनॉनमधून तेल अविव आणि उत्तरेकडील भागाला ड्रोन आणि क्षेपणास्त्र्ा हल्ले करून टार्गेट केले जात आहे. इस्त्र्ाायलची संरक्षण यंत्रणा आणखी अलर्ट झाली आहे.
हमास संपलेली नाही – खामेनी
हमासच्या म्होरक्या सिनवारच्या खात्म्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हमास संपलेली नाही, आम्ही बदला घेऊ, असा इशारा इस्त्र्ाायलला दिला आहे.
युद्ध थांबवण्याची तयारी दर्शविली होती
z हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केल्यानंतर पंतप्रधान नेत्यानाहू यांनी इस्त्र्ाायल-हमास युद्ध थांबविण्याची तयारी दर्शविली होती. ओलीस ठेवलेल्या इस्त्र्ाायली नागरिकांची सुटका केल्यास युद्ध थांबवू, असे ते म्हणाले होते. मात्र, आता हमासच्या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका आणखी उडणार आहे.