देश-विदेश

हिजबुल्लाह हल्ला चढविण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात आकाशात शेकडो विमाने झेपावली…


इस्रायलने आपल्या देशात आपत्कालीन स्थिती जाहीर करत लेबनॉनच्या हवाई क्षेत्रात शेकडो लढाऊ विमाने घुसवत हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर हल्ला चढविला आहे. हिजबुल्लाह इस्रायलवर जोरदार हल्ला करण्याची तयारी करत असताना इस्रायलने हा हल्ला करून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

या हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून हिजबुल्लाहने इस्रायलवर ३२० हून अधिक कत्युशा रॉकेट डागली आहेत. सैन्य कमांडर फुआद शुक्रच्या हत्येचा बदला घेण्यास सुरुवात केल्याचे हिजबुल्लाने म्हटले आहे. इस्रायलची सर्वात मोठी ताकद असलेल्या आयर्न डोमच्या ठिकाण्यांवरच हल्ले करण्यात आल्याचे हुजबुल्लाने स्पष्ट केले. तसेच हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्णपणे यशस्वी ठरल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे.

हिजबुल्लाहसोबत युद्ध भडकण्याची चिन्हे असल्याने इस्रायलने ४८ तासांसाठी देशात इमर्जन्सी जाहीर केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उच्च स्तरीय बैठक घेतली आहे. यामध्ये त्यांनी आम्ही उत्तरेकडील रहिवाशांना सुरक्षित त्यांच्या घरी परत आणण्यासाठी व देशाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत, जो कोणी आम्हाला नुकसान करेल त्याचेही आम्ही नुकसान करू, असे म्हटले आहे.

 

इस्रायलच्या सैन्याने म्हटले की, आमच्या लढाऊ विमानांनी हिजबुल्लाहच्या हजारो रॉकेट लाँचर बॅरलवर हल्ला केला आणि नष्ट केले आहेत. उत्तर आणि मध्य इस्रायलवर वेगाने हल्ला करण्याचा त्यांचा हेतू होता. लेबऩॉनमधील ४० हून अधिक लाँच पॅडवर हल्ला करण्यात आल्याचे सैन्याने स्पष्ट केले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *