पाकिस्तानच्या कारागृहात भारतीय नागरिक सरबजीत सिंग (Sarabjit Singh) यांची हत्या प्रकरणातील आरोपी आमीर सरफराज याची लाहोरमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे ‘ने दिले आहे.
पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली सबरजीत सिंग यांना अटक केली हाेती. यानंतर त्यांना तुरुंगात टाकले. येथे त्यांचा अतोनात छळ करण्यात आला होता. ते 1990 पासून पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात होते. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न केले मात्र पाकिस्तानने त्यांच्यावरील आरोप कायम ठेवले. सरबजीत सिंग यांची 2013 मध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरून सरफराजनेच हत्या केली होती.लाहोर येथील कारागृहात अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची रविवारी हत्या करण्यात आली. सर्फराजला ‘अज्ञात हल्लेखोरांनी’ गोळ्या घातल्या.
Amir Sarfaraz, the man behind Indian national Sarabjit Singh's murder in jail, was shot dead by unknown men in Lahore.
Read more: https://t.co/9DYWvApNPc#SarabjitSingh #Indian #Lahore #AmirSarfaraz | @arvindojha pic.twitter.com/xkklWLbOMd
— IndiaToday (@IndiaToday) April 14, 2024
काेण हाेते सरबजीत सिंग ?
सरबजीत सिंग यांचे भिखीविंड हे गाव पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर आहे.त्याचे कुटुंबीय आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार, सरबजीत इतरांच्या शेतात मजुरी करायचे. त्यांनाकसूरजवळ पाकिस्तान रेंजर्सनी अटक केली होती. ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली. सरबजीत यांची बहीण आणि कुटुंबीयांना त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता, एक वर्षानंतर त्यांना सरबजीत यांचे एक पत्र आले. यानंतर त्यांना पाकिस्तानने अटक केल्याचे उघड झाले होते. ओळखीचा पुरावा नसल्यामुळे त्यांना मनजीत सिंग म्हणून दोषी ठरवून पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा ठोठवली, असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्याच्यावर लाहोर बॉम्बस्फोटातील आरोप असाही ठपका ठेवण्यात आला होता. 991 मध्ये सिंग यांना पाकिस्तानच्या लष्कराच्या कायदान्वये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
1991 मध्ये त्याला दोषी ठरवल्यानंतर सिंग यांच्या वकिलांनी अनेक दयेच्या याचिका दाखल केल्या होत्या. पाचव्या याचिकेत भारतातून गोळा केलेल्या 100,000 स्वाक्षऱ्यांचा समावेश होता. कोणतीही दयेची याचिका स्वीकारली गेली नाही. २०१२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रापती आसिफ अली झरदारी यांनी त्यांच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतर करण्यासाठीच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली होती.
सरबजीत यांना लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात २३ वर्षे ठेवण्यात आले होते. अखेर 26 एप्रिल 2013 रोजी सरबजीत यांची र विटा, धारदार धातूचे पत्रे, लोखंडी रॉड आणि ब्लेडने वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. अखेर उपचार सुरु असताना 2 मे 2013 रोजी सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला होता.
कोण होता अमीर सरफराज ?
सरबजीत सिंग यांचा मारेकरी असणारा अमीर सफरराज हा पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड डॉनपैकी एक होता. कारागृहात सरबजीत सिंगवर हल्ला केल्याप्रकरणी अमीर सरफराज आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 2018 मध्ये पाकिस्तानी कोर्टाने पुरावा नसल्यामुळे अमीर सरफराज याची सरबजीत सिंग यांच्या हत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली होती.