बीड जिल्हा

Pankaja Munde : बीडमधून मोठी बातमी ! । ‘त्या’ Viral Clip नंतर मुंडे समर्थकांनी कुंडलिक खाडेंचं ऑफिस फोडलं


 

Pankaja Munde : बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला होता. हा पराभव मुंडे समर्थकांच्या अजूनही पचनी पडलेला नाही.त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील काही तरुणांनी आत्महत्याही केल्या आहेत.

 

यानंतर बीडमध्ये खळबळ उडवून देणारी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना धोका दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांची असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या क्लिपमुळे बीडमधलं वातावरण चांगलंच तापलं आहे. गुरुवारी सायंकाळी मुंडे समर्थकांनी थेट कुंडलिक खाडे यांचं कार्यालयच फोडले आहे.

 

 

लोकसभा निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून पुन्हा एकदा बीड मतदारसंघातलं वातावरण तापण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचे काम केले असल्याची कबुली एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये देताना ते दिसून येत आहेत.

 

यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच असा धोका दिला हेही सांगितल्याचं समोर आलं आहे.सोनवणे यांना निवडणुकीत मतांसह पैशांची मदत केल्याची कबुलीही त्यांनी या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहेत.

या ऑडिओ क्लिपमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यात कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे बीडमध्ये येताच त्यांच्या गाडीवर मी हल्ला करतो असे देखील त्यांनी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. यावर कुंडलिक खाडे यांनी फोनवर हा माझा आवाज नाही म्हटलं आहे. मात्र, त्यांचा मोबाईल सध्या बंद आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *