मुलगी झोपेत चालत जंगलात गेली, 2 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन, अखेर ड्रोनमध्ये कैद झाली ..; थरारक VIDEO
अमेरिकेतील लुसियाना परिसरातून शनिवारी 14 सप्टेंबर रोजी 10 वर्षांची मुलगी हरवली. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. मुलगी रात्री अचानक कुठे गेली यामुळे शोधाशोध सुरु झाली. यानंतर तिच्या घराजवळचे सीसीटीव्ही पाहण्यात आले.
यामध्ये ती मुलगी झोपत जंगलाकडे जाताना दिसली. अशावेळी काय करावा हा प्रश्न पालकांना आणि पोलिसांना पडला.
यावेळी ड्रोन मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाच्या कंपनीने मुलीच्या शोधात मदत केली आणि कंपनीच्या मालकांचे म्हणणे आहे की “10 वर्षांच्या मुलीचा शोध आणि बचाव कार्यात भाग घेतल्याचा त्यांना अतिशय आनंद वाटत आहे. ”
1 वाजण्याच्या आधी ती बेपत्ता झाली होती. तिला शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली. शनिवारी ती डबर्ली येथील घरातून शनिवारी रात्री उशिरा निळ्या रंगाचा फ्रोझन रंगाचा पायजामा आणि शर्ट घालून घराबाहेर पडली. यामुलीला जेव्हा ड्रोनमध्ये पाहण्यात आलं तेव्हा ती जंगलात झोपलेली दिसली.
वेबस्टर शेरिफ जेसन पार्कर म्हणाले, “हा फोटो रविवारी सकाळी घेण्यात आला होता आणि आम्ही ट्रेल कॅमेऱ्याच्या परिसरात आमच्या शोधावर लक्ष केंद्रित करत होतो.” “आम्ही ताबडतोब आमची सर्व संसाधने पाठवली आणि परिसराचा संपूर्ण शोध घेण्यास सुरुवात केली. आम्ही आमचे ड्रोन पाठवले आणि शोधात मदत करण्यासाठी इतर एजन्सीशी संपर्क साधला. होमलँड सिक्युरिटीने त्यांचे ड्रोन देखील पाठवले आणि अजूनही ते घटनास्थळी आहेत.”
पार्कर म्हणाले की, ट्रॅकिंग कुत्र्यांची देखील यावेळी मदत घेण्यात आली. मुलीच्या निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात शोधाशोध सुरु होती. यानंतर ही 10 वर्षांची मुलगी जंगलात सापडली. जी जंगलाच्या कुशित झोपली होती तिच्या अंगावर आकाशाची चादर होती. अनेक तास उपाशी चालत राहिल्याने तिला भुकही लागली होती. ती फार थकली देखील होती. मुलीला घेऊन तिच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आलं.