आगळे - वेगळे

दोनदा जन्मलेलं जगातील एकमेव बाळ! आईच्या पोटातून बाहेर काढलं, परत टाकलं आणि…


मातृत्व हा जगातील सर्वात विलक्षण अनुभव आहे. प्रत्येक महिला हा अनुभव घेण्यास इच्छुक असते. नऊ महिले आई आपल्या बाळाला गर्भात वाढवते. बाळाची प्रत्येक हालचाल आईला जाणवत असते.

नऊ महिने हे बाळ आईच्या गर्भात सुरक्षित असते. आई होणाऱ्या महिलेसाठी प्रसुतीची वेळ हा अतिशय कठिण प्रसंग असतो. नऊ महिने पूर्ण झाल्यानंतपर बाळ जन्माला येते. एका बाळाने दोनदा जन्म घेतला असं कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र, एका महिलेने आपल्या बाळाला दोनदा जन्म दिला आहे. दोनदा जन्माला आलेले हे जगातील एकमेव बाळ आहे. आईच्या गर्भातून हे बाळ बाहेर काढण्यात आले. यानंचर पुन्हा एकदा हे बाळ आईच्या गर्भात टाकण्यात आले. यामुळे या महिलने दोनचा प्रसुतीचा अनुभव घेतला आहे.

 

लिसा कॉफी (वय 23) असे एका बाळाला दोनदा जन्म देणाऱ्या महिलेचे नाव आहे. लिसा UK मधील केंटची रहिवासी आहे. लिसाने मातृत्वाचा अत्यंत विलक्षण अनुभव घेतला आहे. सहाव्या आणि नवव्या महिन्यात असं दोनचा लिसाच्या बाळाने जन्म घेतला. सहाव्या महिन्यात लिसाचे बाळ गर्भाशयातून बाहेर काढण्यात आले. पुन्हा ते लिसाच्या गर्भाशयात टाकण्यात आले. यानंतर नऊ महिन्यानंतर पुन्हा लिसाची नॉर्मल प्रसुती झाली. लिसाने गोंडस मुलीला जन्म दिला. लिसाच्या मुलीचे नाव लुका असे ठेवले आहे.

 

वैद्यकीय चमत्कार

लुका दोनदा जन्मलेलं जगातील एकमेव बाळ आहे. लुकाचा जन्म म्हणेज एक वैद्यकीय चमत्कारच म्हणावा लागेल. आईच्या गर्भात असतानाच लुकाला स्पिना बिफिडा हा दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामुळे आईच्या गर्भातच लुकाच्या पाठीच्या कण्याला संसर्ग झाला होता. अशा स्थितीत हा गर्भ वाढला असता तर संसर्ग आणखी वाढून धोका निर्माण झाला असता. यामुळे 27 आठवड्यात गर्भाशयातून भ्रुण बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रिया करुन भ्रुण पुन्हा लिसाच्या गर्भाशयात टाकण्यात आले. यानंतर 38 आठवड्यांमध्ये गर्भाची वाढ पूर्ण झाल्यावर नऊ महिन्यांनी लिसाची प्रसुती करण्यात आली. लुकाने दोनदा जन्म घेतला. जन्मानंतरही लुकाला NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये ठेवण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला घरी सोडण्यात आले. जन्मानंतरही लिसावर उपचार सुरु आहेत. स्पिना बिफिडा हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *