गोंदिया जिल्ह्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. पत्नीने पतीची हत्या केली असून त्यानंतरही आकस्मिक मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव मेघशाम भावे असे असून आरोपी महिलेचे नाव वैशाली मेघशाम भावे असे आहे.
पती रात्री झोपेत असतानाच पत्नीने त्याचा जीव घेतला होता. जेव्हा कुटुंबियांनी आकस्मित मृत्यू म्हणून अंत्यविधीची सर्व तयारी केली. त्यानंतर मृतदेहाला आंघोळ घालताना त्याच्या गळ्यावरील व्रण निर्दशनास आले. त्यामुळे कुटुंबियांना हा घातपात असल्याचा संशय आला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी पत्नी वैशालीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमध्ये सर्व सत्य समोर आले. (Cime in Gondia wife killed her husband in isapur)
नेमकं प्रकरण काय?
गोंदिया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ईसापुरमधील ही घटना आहे. 42 वर्षीय मेघशाम भावे यांची हत्या त्यांची पत्नी 38 वर्षीय वैशालीकडून करण्यात आली होती. तिने मेघशाम भावे यांची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. 11 जूनच्या रात्री जेवन करुन भावे कुटुंबीय झोपले होते. तेव्हा मेघशाम झोपेत असताना वैशालीने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. सकाळी मुलाला जाग आली नाही, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्याला हाक मारली. पण, मुलाने प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी मुलाच्या पायाला स्पर्श करुन उठवण्याचा प्रयत्न केला. पण मेघशामचे थंड पडलेले त्यांना जाणवले आणि मुलाचे निधन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर मेघशामचा आकस्मिक मृत्यु झाला असे समजून अंत्यविधीची सर्व तयारी कुटुंबाने केली. सर्व नातेवाईक आल्यानंतर दुपारी 1 वाजता अंत्यविधीसाठी विधींप्रमाणे त्यांनी मेघशामच्या मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली. पण त्यावेळी त्याच्या गळ्यावरती काळ्या रंगाचे व्रण दिसून आले. ही बाब आई-वडिल आणि नातेवाईकांच्या लक्षात येताच मेघशामचा आकस्मिक मृत्यु नसून हत्या करण्यात आल्याचा संशय त्यांना आला. यानंतर तातडीने घटनेची माहिती ही अर्जुनी मोरगाव पोलीसांना दिली. पोलीसांनी तात्काळ कारवाई करत ईसापुरमधील भावेंचे घर गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. संशयावरुन वैशालीला ताब्यात घेवून कसून चौकशी केली. चौकशीमध्ये पत्नीने मेधशामचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. तर हत्येमागचं नेमक कारण काय? याचा तपास मोरगांव अर्जूनी पोलिस घेत आहेत.