आगळे - वेगळे

अबब !S चक्क 61 वर्षीय निवृत्त शिक्षकाने19 वर्षीय विद्यार्थिनीशी केला प्रेमविवाह


माळेगाव : मानवी जीवनात विवाहास अनन्यसाधारण महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत विवाह करण्यासाठी काही नियमावली दिल्या आहेत. यामध्ये मुलाचे वय २१ वर्ष व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असावे लागते. मात्र, प्रेमविवाह करताना वय, जात, धर्म, पंथ अशा बाबींचा विचार केला जात नाही. असाच एक प्रेमविवाह झाला आहे. यामध्ये वयोमान व प्रतिष्ठेचा विचार न करता म्हातारपणी सांभाळ करण्यासाठी एका निवृत्त शिक्षकाने केलेला प्रेमविवाह सध्या बारामती तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रेमविवाहानंतर माळेगावमधील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा पाहिला मिळत आहे.

माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करत होता, त्याच शाळेतील १९ वर्षीय मुलीसोबत रितसर व सहमतीने प्रेमविवाह केला. खरे तर शिक्षक हा मार्गदर्शक गुरु म्हणून ओळखला जातो. मात्र, या शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केल्याने शिक्षकांच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचला आहे. मात्र, आपण या वयात लग्न केल्याचा किंचितही पश्चात्ताप झाला नसल्याचे त्या शिक्षकाच्या चेहऱ्यावरील हावभाव सांगत होते.

दरम्यान, आपल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर संबंधित मुलीच्या सहमतीने आपण प्रेमात पडलो असल्याचे संबंधित शिक्षकाने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी संबंधित शिक्षकाची चांगलीच झाडाझडती घेऊन सुनावले. मात्र, तो शिक्षक व ती मुलगी लग्न केल्यानंतर एकमेकांना साथ देण्यावर ठाम होती. यामुळे प्रेमात व युध्दात सर्वकाही माफ असतं याची प्रचिती आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *