आगळे - वेगळेजनरल नॉलेज

सगळ्यात भीषण विमान अपघात,फोटो पाहून संपूर्ण जग होतं हळहळलं! 583 प्रवाशांचा जळून झाला होता कोळसा


विमानतळाच्या एकाच रनवेवर दोन विमानं समोरासमोर आली आणि त्यांची टक्कर

स्पेनमध्ये झालेल्या जगातल्या सगळ्यात भीषण विमान अपघातामुळे 27 मार्च 1977 हा दिवस जगभरात सगळ्यांच्याच स्मरणात आहे. टेनेराइफ विमानतळाच्या एकाच रनवेवर दोन विमानं समोरासमोर आली आणि त्यांची टक्कर झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला होता.

दोन्ही वैमानिकांसह 583 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

स्पेनमध्ये टेनेराइफ बेटावर लॉस रोडियोस विमानतळावर 27 मार्च 1977 रोजी जगातला सगळ्यात मोठा भीषण विमान अपघात झाला होता. या अपघातात तब्बल 583 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. आजही जेव्हा केव्हा या अपघाताचं भयावह दृश्य फोटोंच्या माध्यमातून समोर येतं, तेव्हा साहजिकच मन विचलित होतं. या दुर्घटनेच्या स्मरणार्थ त्याबद्दल माहिती जाणून घेऊ.

विमान कंपनीच्या इतिहासातलासुद्धा हा सगळ्यात भयानक अपघात म्हणून नोंदवला गेला आहे. समोरासमोर टक्कर झालेल्या दोन विमानांपैकी एक होतं केएलएम फ्लाइट 4805 आणि दुसरं होतं पॅन एएम अमेरिकन फ्लाइट 1736 . ही दोन्ही विमानं बोईंग 747 प्रकारातली विमानं होती.

केएलएम फ्लाइट 4805 ने अॅमस्टरडॅम इथून उड्डाण केलं आणि पॅन अमेरिकन फ्लाइट 1736ने लॉस एंजलिस इंटरनॅशनल एअरपोर्टवरून उड्डाण केलं होतं. स्पेनमधल्या कॅनरी बेटावर असलेल्या ग्रॅन कॅनेरिया विमानतळावर ही दोन्ही विमानं उतरणार होती.

ग्रॅन कॅनेरिया विमानतळावर पॅसेंजर एरियामध्ये एक छोटा स्फोट झाला. त्यामुळं तिथं थोडा गोंधळ उडाला आणि विमानतळ बंद करून विमानांच्या वाहतुकीची दिशा बदलण्यात आली होती. टेनेराइफ इथं एकच व्यक्ती संपूर्ण एअर ट्रॅफिक कंट्रोल करत होती आणि बहुतांश विमानांना तिथंच पाठवण्यात आलं. ग्रॅन कॅनेरिया विमानतळ वाहतुकीसाठी खुला झाल्यावर टेनेराइफमधून बाहेर पडण्यासाठी विमानांची जणू झुंबड उडाली होती.

टेनेराइफ एअरपोर्टवर पॅन अमेरिकी विमानाच्या अगदी पुढेच केएलएमचं बोईंग 747 हे विमान होतं. केएलएम विमानाचा वैमानिक उड्डाणासाठी रनवेवर विमान आणतच होता तेव्हाच अमेरिकन विमानही मागे येऊ लागलं. टेनेराइफ विमानतळावर पार्किंगमधून विमानं निघाली की, उड्डाण करताना त्यांना 180 अंशात फिरावं लागतं. अमेरिकी विमान रनवेमधून बाहेर आल्यानंतर केएलएम विमानाला उड्डाण करण्यासाठी त्यानं मार्ग मोकळा करून देणं अपेक्षित होतं.

विमानतळावर धुकं असल्यामुंळ वैमानिकांसाठी नेहमीपेक्षा दृश्यमानता कमी होती. अमेरिकन विमान रनवेवर आलं तेव्हा साधारण 500 मीटर इतकी दृश्यमानता होती. नंतर ती आणखी कमी होत गेली आणि काही वेळानं तर फक्त 100 मीटरपेक्षाही कमी अंतरावरचंच दिसू शकत होतं. उड्डणासाठी केएलएम विमानाने वेग वाढवला; मात्र तोपर्यंत पॅन अमेरिकन विमान जागचं हललंच नव्हतं. जेव्हा वैमानिकाला समोरून केएलएम विमान येताना दिसलं तेव्हा त्यानं रनवे वरून बाजूला होण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

अशातच दोन्ही विमानांची भीषण टक्कर झाली आणि स्फोट होऊन क्षणार्धात 583 प्रवाशांचा मृत्यू झाला. अमेरिकन विमानातल्या 61 प्रवाशांना कसंबसं वाचवण्यात यश आलं.या भीषण अपघाताच्या तपासात 70 तज्ज्ञांचा समावेश होता. यात अमेरिका, नेदरलँड्स आणि दोन्ही विमान कंपन्यांच्या तज्ज्ञांचा समावेश होता. परस्पर संवादाचा अभाव हेच अपघाताचं मूळ कारण होतं. उड्डाणासाठी परवानगी मिळाली आहे, असं केअलएफच्या वैमानिकाला वाटलं; मात्र हे विमान रनवेवरच उभं होतं, असं टेनेराइफ कंट्रोल टॉवरनं म्हटलं होतं.

या दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी नवीन नियम करण्यात आले. परस्पर संवादाचा अभाव लक्षात आल्यानं, जोपर्यंत टेकऑफ होत नाही, तोपर्यंत या शब्दाचा वापर न करण्याचा नियम ठरवण्यात आला. तसंच पायलटशी संपर्क साधताना डिपार्चर हा शब्द वापरला जाईल. याशिवाय क्रू रिसोर्स मॅनेजमेंट सुरू करण्यात आलं. यामुळं एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि फ्लाइट क्रू यांच्या दरम्यानचा संवाद सुधारण्यात आला आणि परस्परांमध्ये भाषेची काही मानकं तयार केली गेली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *