मेरठ : भारतामध्ये लाखो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची धार्मिक मान्यता आहे. इतिहास आहे. तसेच अनेक ठिकाणी विविध प्रकारचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र, एक मंदिर आहे, ज्याठिकाणी सिगारेट वापरुन आरती केली जाते.
तसेच या मंदिरात दारू आणि सिगारेट अर्पण केल्याने इच्छापूर्ण होते, असेही मानले जाते.
श्री धन्ना बाबाचे हे मंदिर आहे. याठिकाणी गूळ हरबऱ्यासह दारू अर्पण केली जाते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटत असेल. मात्र, शेकडो वर्षांपासून ही परंपरा मानली जात आहे. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मंदिराचे पुजारी राजेश यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले हे मंदिर 500 वर्षांपेक्षा जुने मंदिर आहे. ज्याठिकाणी हे मंदिर तयार झाले होते, त्याठिकाणी कधीकाळी श्री धन्ना बाबा राहायचे. ते काली मातेचे खूप मोठे पुजारी होते. एके दिवशी ते काली मातेची पूजा करत होते. त्यामुळे त्यांनी काली मातेला रुद्र रूपात पाहिले. मग त्यांनी काली मातेला विचारले, माता तुम्ही कुठे जात आहात. काली मातेने सांगितले की, मी राक्षसांचा संहार करणार आहे. अशा स्थितीत बाबांनी त्यांना सांगितले की, नरसंहार करण्यापेक्षा त्यांनी त्यांचाच बळी घ्यावा.
तेव्हा काली मातेने सांगितले की, मी 2 दिवसांनी येईल. जेव्हा दोन दिवसांनी काली माता बळी घ्यायला आली तेव्हा त्यांनी पाहिले की, श्री धन्ना बाबा हे काली मातेच्या भक्तीत लीन झाले होते. यानंतर काली मातेने त्यांच्याकडून वचन घेतले होते की, याचठिकाणी त्यांनी समाधी घ्यावी. त्यानंतर बाबांनी याच ठिकाणी समाधी घेतली. तेव्हापासून आजतागायत श्री बाबा धन्ना यांच्या या समाधीस्थळावर पूजा केली जाते. गिरहार समाजातील लोक श्री धनाबाबांना त्यांचे पूर्वज मानतात.
मंदिराचे पूजारी राजेश यांनी सांगितले की, श्री धन्ना बाबा यांनी काली मातेचे साक्षात दर्शन केले होते. यानंतर त्यांनी वरदान दिले. जो कुणी धन्ना बाबाची पूजा करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अशा स्थितीत बाबांनी याच ठिकाणी समाधी घेतली. देशभरातून लोक येथे पूजा अर्चना करण्यासाठी येतात. बाबांना दारू आणि सिगारेट आवडतात. त्यामुळे भक्त अशा प्रकारचा प्रसाद बाबांना देतात. पण बाबाचा मूळ प्रसाद गूळ आणि हरभरा आहे, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीवरुन आलेल्या वेद प्रकाश गौहर यांनी सांगितले की, श्री धन्ना बाबा से जे काही मागितले जाते, ते त्यांना मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे येत आहेत.