Navgan News

धार्मिक

५०० वर्षांनंतर तयार होतोय दुर्मिळ वैभव लक्ष्मी राजयोग! नरक चतुर्दशी दिवशी ‘या’ तीन राशींचं उजळणार भाग्य


दिवाळी म्हणजे दिवे, रांगोळी, फराळ, नवनवीन कपडे आणि सगळीकडे असलेल्या रोषणाईचा सण. चार दिवसांच्या या सणात नरक चतुर्दशीचा दिवशी विशेष महत्त्वाचा असतो. या पवित्र दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबरला, सोमवारी एक अत्यंत दुर्मिळ वैभव लक्ष्मी राजयोग तयार होत आहे.

हा राजयोग तब्बल ५०० वर्षांनंतर पुन्हा दिसणार आहे. तसेच य योगाचे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसणार असून त्यांच्यासाठी आर्थिक समृद्धी, प्रगती, करिअरमध्ये यश , विविध लाभदायक संधी आणि परदेशी प्रवासात प्रगती घेऊन येणार आहे.

वैदिक शास्त्रानुसार हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. या वर्षी दिवाळीच्या दिवशी चंद्र आणि शुक्र यांची कन्या राशीत युती होणार आहे. चंद्र वैभवाचे प्रतीक आहे तर शुक्र लक्ष्मीची निशाणी मानला जातो. या दुर्मिळ योगामुळे काही राशींना विशेष लाभ होणार आहेत.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायक ठरेल. हा योग त्यांच्या लग्न भावावर तयार होत असल्यामुळे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच काम आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. ज्यांनी मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले आहे, त्यांना नेतृत्वाच्या संधी मिळतील. परदेशाशी संबंधित कामे किंवा प्रवासामुळे यश मिळेल. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनातही सुख-समाधान राहील. अविवाहितांसाठी विवाहाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, तर विवाहितांसाठी वैवाहिक जीवन आनंददायी राहील.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा योग शुभ आणि फायदेशीर आहे. त्यांच्या गोचर कुंडलीत भाग्य स्थानावर हा योग तयार होत असल्यामुळे, अडचणी सहजपणे दूर होतील आणि करिअरमध्ये प्रगती होईल. व्यापार किंवा व्यवसायातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवास, नवीन क्लायंट्स किंवा लाभदायक व्यवहारांसाठी संधी उपलब्ध होतील. धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा यशस्वी होण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यांच्या उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात हा योग निर्माण होत आहे, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात नवीन करार, व्यवहार आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो, तसेच लॉटरी लागेल किंवा अनपेक्षित स्रोतांमधूनही फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता असून कौटुंबिक वातावरणात आनंद आणि सकारात्मकता वाढेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. नवगण न्युज24 माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *