मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. अशातच आज भाजपने 99 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.यामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली असून नितेश राणे यांनाही संधी देण्यात आली आहे.
(maharashtra assembly election 2024 bjp first list 99 candidates announce mahayuti devendra fadnavis bjp maharashtra politics )
भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 99 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली असून नितेश राणे यांनाही संधी देण्यात आली आहे.महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.
पाहा भाजपची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 BJP 1st Candidates List)
राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे
2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या
2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रच बदललं
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.
मात्र, निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.
दरम्यान, 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ठाकरेंचं सरकार पाडलं. यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने राज्यात महायुतीचं सरकार बनवलं. तर 2023 साली अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि ते थेट महायुती सरकारमध्ये सामील झाले.
यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहेत. ज्यामध्ये दोन्हीकडे 3-3 पक्षांचा समावेश आहे.