ब्रेस्टफिडिंग करताना झोपली आई; बाळ दूध पितच राहिलं, झाला मृत्यू,बाळाला दूध पाजताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
आईचं दूध बाळासाठी पूर्णान्न मानलं जातं. किमान सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरं काहीच देऊ नये, असं म्हणतात. पण आईचं दूध पितानाच एका बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ब्रेस्टफिडिंग करताना आई झोपली. त्यावेळी बाळ दूध पितच राहिलं. जेव्हा तिला जाग आली तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.
इंग्लंडमधील ही धक्कादायक घटना आहे. एव्हलिन असं या मृत बाळाचं नाव आहे. लीड्स रुग्णालयात बाळाचा जन्म झाला. डिलीव्हरीनंतर काही तासांतच आई आणि बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. घरी गेल्यानंतर आईने बाळाला दूध पाजलं. दुसऱ्या दिवशीच या बाळाचा मृत्यू झाला आहे.
ब्रेस्टफिडिंग करताना झोपली आई
प्रसूतीवेळी आई खूप थकली होती. तिची झोपही पूर्ण झाली नव्हती. अशा परिस्थिती तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी गेल्यानंतर बाळाला आपल्यासोबत बेडवर घेऊन ही आई झोपली. झोपेतच ती त्याला दूध पाजत होती. आई आणि बाळ दोघंही कुशीवर होते. ब्रेस्टफिडिंग करताना करता आईला झोप लागली.
आईला जेव्हा जाग आली तेव्हा बाळामध्ये काहीच हालचाल नव्हती. त्याच्या हृदयाचे ठोके थांबले होते. त्याचा श्वासोच्छवासही थांबला होता.
दूध पिताना बाळाचा मृत्यू कसा झाला?
आई झोपलेली असताना बाळ दूध पितच राहिलं. ते खूप दूध प्यायलं. इतकं की त्याची श्वासनलिकाही दुधाने भरली. त्याचे हृदयाचे ठोके थांबले, त्याचा श्वासोच्छवास बंद झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
ब्रेस्टफिडिंग करताना काय काळजी घ्यावी?
बाळाला दूध पाजताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती आईला नसते. बाळाला कोणत्या प्रकारे स्तनापान करावं. याची योग्य माहिती जाणून घेऊयात.
स्तनपान कसंकरावं?
बाळाला दूध पाजताना बाळाचं डोकं आईच्या छातीपेक्षा जास्त वर असावं. म्हणजे सुमारे 45 अंशांच्या कोनात राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे शक्यतो बाळाला थोडं बसवून स्तनपान करणं चांगलं. यासाठी बाळाची मान आपल्या हात धरा किंवा आधार द्या.
झोपूनस्तनपान करू नका
अनेक स्त्रिया बाळाला झोपून स्तनपान करतात. हा अतिशय चुकीचा पर्याय आहे. बाळाला झोपवून कधीही स्तनपान करू नका. यामुळे मुलाला कानाच्या इनफेक्शनचा धोका होतो.
लगेचझोपवूनका
बऱ्याच वेळा बाळाला दूध पाजल्यावर लगेचच बेडवर ठेवलं जातं. पण हे बाळासाठी चांगलं नाही. बाळाला दूध प्याजल्यानंतर लगेच अंथरुणावर किंवा मांडीवर झोपू देऊ नका. यामुळे बाळाला दूध पचणार नाही किंवा त्याला उलटी होईल.
खांद्यावर घेऊन पाठ थोपटा
बाळ दूध प्यायल्यावर त्याला खांद्यावर घ्या आणि त्याची पाठ हलकेच चोळा. यामुळे प्यायलेलं दूध घशात राहणार नाही. स्तनपान करताना पोटात गेलेली हवा बाहेर येईल.
ढेकर काढा
काही लोक बाळाला स्तनपानानंतर लगेच झोपवतात. त्यामुळे प्यायलेलं दूध श्वासनलिकेत अडकण्याची शक्यता असतं. त्यामुळेच बाळाला झोपेतही उलटी होऊ शकते. त्यामुळे ढेकर काढा. बाळ थोडं मोठं असेल तर, त्याला बसवून ढेकर काढा.