आंतरराष्ट्रीय

जपान आणि रशियाला टाकलं मागे,आशियातील तिसरी महासत्ता बनला भारत


पूर्ण जगात भारताची ताकद काय आहे हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. नुकताच एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवीने जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्सच्या क्रमवारीत भारत महत्त्वपूर्ण स्थानावर पोहोचला आहे.

 

अहवालानुसार, अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरी महासत्ता बनलाय. भारताने रशिया आणि जपानला देखील मागे टाकलंय. भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा स्कोअर 39.1 आहे, तर जपानचा स्कोअर 38.9 आहे, ज्यामुळे तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. या क्रमवारीत पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट आहे. आशियात अजूनही अमेरिका आणि चीन मोठी सत्ता असली तरी भारताकडे मोठी संधी आहे. चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद स्थिर आहे. आठपैकी सहा शक्तींच्या पॅरामीटर्समध्ये अमेरिका आघाडीवर आहे. पण भारताची स्थिती सुधारत आहे. जपान आणि रशियाला मागे टाकून भारताने आशियामध्ये तिसरे स्थान पटकावले आहे.

 

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचं वर्चस्व वाढल्याने याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यांच्या दूरदर्शी दृष्टीकोन आणि जागतिक रणनीतीमुळे हे शक्य झाल्याचं त्यांनी म्हटले आहे. अहवालानुसार, 2023 मध्ये भारताने एशिया पॉवर इंडेक्स देशांसोबत सर्वाधिक देशांसोबत संवाद केला. भारत आपली राजनैतिक स्थिती मजबूत करत असल्याचे देखील या अहवालातून समोर आले आहे.

 

भारताची शक्ती कशी वाढत आहे?

ऑस्ट्रेलियन थिंक टँकच्या मते, भारताचं सामर्थ्य हे त्यांची लोकसंख्या आणि वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. अहवालात भारताची आर्थिक क्षमता 4.2 अंकांनी वाढली आहे. भविष्यातील संसाधनांच्या बाबतीत भारताच्या गुणसंख्येमध्ये 8.2 गुणांची वाढ झाली आहे. भारताची तरुण लोकसंख्या येत्या काही दशकांमध्ये भारताला पुढे घेऊन जाऊ शकते. आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या यामुळे भारत आणखी मजबूत होईल.

 

भारत आशियातील खास देश

लोवी इन्स्टिट्यूटचा अहवालानुसार, आशियातील सत्ता जरी अमेरिका आणि चीनकडे असली तरी भारत हा देश आशिया खंडातील खास आणि महत्त्वाचा देश आहे. असे या अहवालात म्हटले आहे. हळूहळू भारताचे आर्थिक सामर्थ्य, लष्करी सामर्थ्य आणि मुत्सद्दी रणनीती वाढत आहे. ज्यामुळे भविष्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. शेजारी देश पाकिस्तानची स्थिती या क्रमवारीत डळमळीत आहे. या यादीत पाकिस्तान 14.4 व्या क्रमांकासह 16 व्या स्थानावर आहे.

 

भारताची सत्ता एका नव्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. भारताने आपल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करत आपली मुत्सद्दी क्षमता वाढवली आहे. भारताच्या भूमिकेचा हा बदल केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण आशिया खंडासाठी महत्त्वाचा ठरेल.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *