ताज्या बातम्या

आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले


बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी सेल्फ डिफेन्समुळे त्याचा एन्काऊंट केल्याचं सांगितलं जात आहे.

 

या एन्काऊंटरवरू विरोधकांनी सरकारला घेरलं असून यामागे षडयंत्र असून प्रकरण दाबण्यासाठी शिंदे याची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. अशातच शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

https://x.com/PawarSpeaks/status/1838235282199470458?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1838235282199470458%7Ctwgr%5E418bbe1833f839d6c2fe4dc3cabd4053e12f4475%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

 

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला?

ठाणे क्राईम ब्राँच युनिट 1 मध्ये अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल होता. त्याचा तपास करण्यासाठी ठाणे क्राईम ब्राँच तळोजा जेलमध्ये गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले. त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्याने त्याला गोळ्या घातल्या. यामध्ये अक्षय शिंदे आणि जखमी पोलीस अधिकारी यांना कळवा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याला उपचारासाठी नेत असताना अक्षय याचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?

पोलिसांवर गोळी झाडली. हवेत फायरिंग केली. त्यामुळे पोलिसांनी संरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडली. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यामुळे आरोपीचा मृत्यू झाला आहे. त्याला डॉक्टर ऑफिशियली मृत घोषित करतील. पण माहितीनुसार त्याचा मृत्यू झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *