ताज्या बातम्या

Modi birthday : मोदींच्या वाढदिवशी ‘या’ 1 कोटी महिलांना मिळणार भेट


पंतप्रधान मोदींचा वाढदिवस एक कोटी महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. जर तुम्ही ओडिशा राज्यातील महिला असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीही असू शकते.

कारण ओडिशा सरकार पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुभद्रा योजना सुरू करत आहे. ज्या अंतर्गत पात्र महिलांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. पात्र महिलांच्या खात्यात 10,000 रुपये थेट जमा केले जातील. ओडिशा सरकारच्या माहितीनुसार, राज्यातील अंदाजे एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

17 सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकार ही योजना सुरू करणार आहे. या योजनेत महिलांना एका वर्षात प्रत्येकी 5,000 रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील.

 

योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, अर्जदार महिलांचे वय 21 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित महिला मूळच्या ओडिशाच्या रहिवासी असल्या पाहिजेत. या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाभ दिला जाणार नाही. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत आहे. त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

सुभद्रा योजना म्हणजे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुभद्रा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत महिलांना वार्षिक 10000 रुपये दिले जातील. ओडिशा सरकारच्या माहितीनुसार, राज्यातील अंदाजे एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *