नात्याला काळिमा फासणारी एक घटना अमेरिकेत घडली आहे. इंडियाना स्टेटमध्ये एका पुरुषाला त्याच्या सावत्र मुलीशी लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला.
त्याने एमडीएमए नावाचं विष तब्बल 12 वेळा दारूत मिसळून पत्नीला दिलं; पण तरीही ती बचावली. ती महिला बचावल्याने या घटनेचा पर्दाफाश झाला. त्याने मुलीसोबत पळून जायचा प्लॅन केला होता. आरोपीचं नाव अल्फ्रेड डब्ल्यू. रूफ असं असून, तो 71 वर्षांचा आहे.
मुलगी व तिच्या मैत्रिणीने दिले ड्रग्ज
आरोपीने कबूल केलं, की 2021च्या अखेरीस त्याने 12 वेळा पत्नीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. रूफने सोमवारी यूएस वेन काउंटी कोर्टात गुन्ह्याची कबुली दिली. रूफने सांगितलं, की सावत्र मुलगी आणि तिची एक मैत्रीण या कटात सामील होती. त्यांनी पत्नीच्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळलं होतं. मुलीला तिच्या आईला मारायचं होतं, जेणेकरून ती रूफशी लग्न करू शकेल आणि आईच्या जीवन विमा पॉलिसीचे पैसे घेऊ शकेल.
ड्रग्ज आणि स्लो पॉयझन आपल्या पत्नीला मारेल हे माहीत होतं, अशी कबुली रूफने दिली. तिला मारायचं हेच त्याचं ध्येय होतं. महिलेने विषारी ड्रिंक प्यायल्यावर ती 13 तासांसाठी बेशुद्ध व्हायची. त्यानंतर मुलगी आणि तिचे मित्र घरी यायचे. ते एकत्र सेक्स करायचे. बायकोला सुरुवातीला कळलं नाही; पण सहा वेळा कोक पिऊन तिला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यानंतर तिने पोलिसांना बोलावलं. कारण डॉक्टरांनी ज्या औषधांमुळे तिला हा त्रास होतोय हे सांगितलं ती तिने घेतली नव्हती. ही गोष्ट 2022 च्या सुरुवातीची आहे.
दारूमध्ये मिसळलं विष
या महिलेला कोणतंही कारण नसताना डोकेदुखी, झोप न येणं अतिसार या समस्या होत्या. त्यानंतर तपासात तिच्या शरीरात कोकेन आणि विष आढळलं. ते महिलेने सेवन केलं नव्हतं. त्यानंतर महिलेने पोलिसांना तो ग्लास दिला, ज्यामधून ती दारू प्यायली होती. त्या ग्लासात पोलिसांना विष आढळलं. यानंतर संशयावरून तिच्या पतीला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं, की तिची सावत्र मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला अटक केलेली नाही. त्यांच्याबद्दल चौकशी सुरू आहे. रूफला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध जिवाला धोका निर्माण करणाऱ्या गंभीर हल्ल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.