राजा-महाराजांच्या कामगिरीची इतिहासात नोंद आहे. एखादा महाराजा 10-10 सैनिकांसोबत एकटा लढायचा. तर कोणी वाघ आणि हत्ती सारख्या जनावरांना मारायचा. राजा-महाराजा सामान्य लोकांच्या तुलनेत खूप बलशाली आणि उत्साही असायचे.
काही राजा तर 100 राण्या देखील ठेवायचे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, एवढी जबाबदारी योग्य प्रकारे निभावण्यामागचं रहस्य काय होतं.
शाही मुलांना बालपणापासूनच अनेक गोष्टींवर फोकस करायला लावला जायचा. यामध्ये व्यायाम आणि खाण्यापिण्याला खूप महत्त्व होते. त्यांच्या डायटमध्ये अशा गोष्टींचा समावेश केला जायचा ज्या शरीराला बलवान बनवण्यासाठी आवश्यक असायच्या. या खाद्य पदार्थांमध्ये भरपूर पोषक तत्व असायची. हे शरीरात नवीन उर्जा आणायचे आणि मेंदूचं कार्य वाढवण्यासाठी ओळखली जात होती.
दूध-तूप
शाही परिवारात बालपणापासूनच दूध-तूपावर जोर दिला जायचा. भाज्या आणि चपाती-भाकरींवर देशी तूप टाकलं जायचं. हे दोन्ही डेअरी प्रोडक्ट खूप हेल्दी बनवतात. NCBI च्या शोधानुसार यांमध्ये हाय क्वालिटी प्रोटीन मिळते. हे दिवसभर एनर्जी देण्याचे काम करते.सोबतच कॅल्शियम, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन बीसारखे आवश्यक न्यूट्रिएंट देतात. ज्यांची शरीराला खूप गरज असते.
बाजरी ज्वारीची भाकरी
सध्या गव्हाच्या चपातीचं चलन वाढलं आहे. मात्र पहिले ज्वारी, बाजरीची भाकरी खायला दिली जायची. हे खाण्यासाठी मेहनत करावी लागायची. ज्यामुळे जबडा आणि दात मजबूत व्हायचे. यामध्ये फायबर आणि खूप जास्त प्रोटीन असते. बाजरी, ज्वारी इत्यारींची भाकरी पोटाला जास्त वेळ भरलेले ठेवते. ज्यामुळे लठ्ठपणा येत नाही.
फळांवर फोकस
शाही डायटमध्ये फळांवर जोर दिला जायचा. जुन्या काळात दोन वेळच्या खाण्याच्या मध्ये भूक ही फळं खाऊन शांत केली जायची. आजारांपासून दूर राहण्यासाठी फळं खायला हवीत. हे फायटोकेमिकल, अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन देते. यामुळे इम्यूनिटी वाढते आणि भरपूर ऊर्जा मिळते.
सुखा मेवा
राजा-महाराजाचा मेंदू सामान्य लोकांच्या तुलनेत जास्त चालत असायचा. मोठे-मोठे निर्णय ते क्षणार्धात घेत होते. यासाठी सुखामेवा जबाबदार आहे. यामध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असते. हे मेंदूची कमजोरी दूर ठेवते. फोकस आणि स्मरणशक्ती वाढवण्यात मदत करते. यामुळे जेवणात हे मिसळलं जात होतं.
स्थानिक भाज्या
शाही डायटमध्ये लोकल फूड टाकले जायचे. आजुबाजूच्या वातावरणाच्या हिशोबाने शरीराला विविध पोषक तत्वाची गरज असते. जसं की, गार ठिकाणी राहणाऱ्या लोकांना गरम ठेवणारे पदार्थ खायला हवीत. यामुळे राजा-महाराजा जेवणामध्ये स्थानिक उगवणाऱ्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, शेंगा इत्यादींचं सेवन करायचे.
मीट
राजा हे नेहमीच शिकारीवर जात असतं. तेथून परतताना ते शिकार केलेलं मांस आणून शिजवायचे. मांसाहारी जेवण प्रोटीन, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, आयरनचे सर्वात चांगले सोर्स मानले जातात. हे शरीराला आतून-बाहेरुन मजबूत करतात. हाडे मजबूत होतात आणि शरीरावर मांस वाढते. तगड्या लोकांच्या डायटचं हे खास सीक्रेट असायचं.
डिस्क्लेमर : ही माहिती फक्त सामान्य माहिती आहे. हे कोणत्याही प्रकारे उपचाराचा पर्याय नाही. जास्त माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.