क्राईम

बापाने कॅब बुक करून लेकीला रात्री शेतात नेलं, दारू पाजली अन् केलं भयंकर ..


कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात. आता देशाची राजधानी दिल्लीतील कंझावला भागात एका व्यक्तीने आपल्याच मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. रविवारी रात्री शेतात एका मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला होता, त्यानंतर पोलीस त्याचा तपास करत होते.

तपासादरम्यान मुलीला कॅबने शेतात आणण्यात आलं आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. पोलिसांनी संशयावरून वडिलांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. लग्नाच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, वडिलांना आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं. पण लग्नाचा विषय काढताच मुलगी नकार द्यायची. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडण झालं. रिपोर्टनुसार, रविवारी रात्री मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या मुलीच्या वडिलांनीच केली होती. आरोपीने कॅब बुक करून नरेला येथून आपल्या मुलीला सोबत आणलं होतं.

या हत्येबाबत प्रत्यक्षदर्शी दीपक डबास आणि नरेंद्र यांनी सांगितलं की, रात्री साडेनऊच्या सुमारास ते परिसरातून जात असताना त्यांना एक ओला कॅब संशयास्पद स्थितीत दिसली आणि त्यांनी कारण विचारलं. कॅब चालकाने सांगितलं, की तो नरेला येथून एक पुरुष आणि एका 25 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आला होता. त्याने स्वतः दारू प्यायली आणि तिलाही प्यायला लावली. यानंतर त्या व्यक्तीने एका निर्जन ठिकाणी कॅब थांबवली आणि मुलीला मारणार असल्याचं सांगितलं. यानंतर लोकांना शेतात एका मुलीचा गळा चिरलेला मृतदेह आढळला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *