आगळे - वेगळेधार्मिक

भारतातील ‘या’ मंदिरात मासिक पाळीतही महिलांना पूजा करण्याची परवानगी, ‘त्या’ काळात महिलांना अपवित्र मानत नाही


मासिक पाळी शाप नव्हे तर वरदान आहे.. पण आपल्या भारतात अनेक ठिकाणी पाळीला अस्पृश्य मानले जाते. त्या दिवसांत महिलांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते. पण बदलत्या काळानुसार आधुनिक विचारांचे लोक याला अजिबात अस्पृश्य मानत नाही. अशात अभिमानाची बाब म्हणजे. भारतातील एका मंदिराने असा आदर्श घालून दिला आहे. ज्यामुळे भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या जातात. कारण इथे मासिक पाळी दरम्यान महिलांना अपवित्र मानले जात नाही. इतर दिवसांप्रमाणेच, महिला त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी मंदिरात विधीनुसार पूजा करण्यासाठी येऊ शकतात.

‘इथे’ मासिक पाळी दरम्यान महिलांना अपवित्र मानले जात नाही!

भारतात महिलांवर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, मासिक पाळी दरम्यान महिलांनी मंदिरात प्रवेश करणे शुभ मानले जात नाही. घरातही महिला या काळात पूजा करत नाहीत. अनेक घरांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात पूजेच्या वस्तूंना हात लावण्याचीही परवानगी नसते. मात्र या विचारापासून दूर जात भारतातील एका मंदिराने महिलांना मासिक पाळीदरम्यान पूजा करण्याची परवानगी दिली आहे. यावरून तुम्हाला कदाचित समजेल की, मासिक पाळीदरम्यान महिलांना अपवित्र समजणे किती चुकीचे आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिराविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

 

मासिक पाळीतही महिलांना या मंदिरात पूजा करण्याची परवानगी

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे असलेल्या मां लिंग भैरवी मंदिरात महिला त्यांच्या मासिक पाळी दरम्यान पूजा करू शकतात. लिंग भैरवी कोईम्बतूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. कोईम्बतूर रेल्वे स्थानकावरून तुम्ही येथे थेट येऊ शकता. तुम्हाला रेल्वे स्थानकाबाहेरून बस आणि कॅबची सुविधा मिळेल. हे मंदिर सद्गुरू जग्गी वासुदेव आश्रमात आहे. हे तामिळनाडूच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

कुठे आहे मंदिर? – मंदिर श्री योगिनी ट्रस्ट, ईशा योग केंद्राजवळ आहे. ईशा योग केंद्र रोडने तुम्ही या मंदिरात पोहोचू शकता.

 

विशेष म्हणजे गर्भगृहात फक्त महिलाच प्रवेश करू शकतात

या मंदिराची विशेष गोष्ट सांगायची झाली तर मंदिराच्या आतील गाभाऱ्यात फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे हे मंदिर महिलांसाठी खास आहे. या मंदिरात पुजारी म्हणून फक्त महिला आहेत. मात्र, येथे केवळ स्थानिकच नाही तर परदेशी महिलाही मंदिराचे व्यवस्थापन करताना दिसतील. येथे केवळ महिलाच मंदिराची देखभाल करतात. या महिला पुजाऱ्यांना मंदिरात ‘भैरागिणी माँ’ असे म्हणतात. भैरवी मंदिरात दर पौर्णिमेला दिवसरात्र देवीची मोठी मिरवणूक निघते. ते पाहण्यासाठी लांबून लोक येतात. महिला आणि पुरुष दोघांनाही या मंदिरात जाण्याची परवानगी आहे.

 

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. नवगण न्युज यातून कोणताही दावा करत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *