नवगण विश्लेषण

जगातील असं एकमेव झाड जे करतं पक्ष्यांची हत्या; फांदीवर बसताच असा घेतं जीव


पक्षी आणि झाड दोघंही एकमेकांची मदत करत असतात. झाड पक्षांनी घरटं बांधण्यासाठी जागा आणि गोड खळं देतं, तर पक्षी झाडाचे बीज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचवण्यचं काम करतात.

ज्यामुळे अनेक ठिकाणी नवी झाडं उगवतात. झाडे हवेत गोड सुगंध सोडतात, जो पक्षी आणि कीटक यांना आकर्षित करतो. त्यामुळे अनेक पक्षी त्यांच्याकडे आकर्षित होतात. पण पृथ्वीवर एक झाड असं आहे, जे पक्ष्यांचे जीव घेतं.

ही झाडं लहान पक्ष्यांना त्यांच्या फांद्यांमध्ये घरटी बनवण्यासाठी आकर्षित करतात. जेव्हा पक्षी त्यांच्या फांद्यांवर बसतात तेव्हा त्यांच्या चिकट बिया पक्ष्यांच्या पंखांना चिकटतात. परिणामी त्यांचे पंख इतके जड होतात की काही वेळाने ते पक्षी जमिनीवर पडतात आणि उपासमारीने मरतात किंवा इतर भक्षक त्यांना खातात. म्हणूनच या वनस्पतींना पक्ष्यांचे मारेकरी असेही म्हणतात.

पक्ष्यांना मारण्यासाठी जगभर कुप्रसिद्ध असलेल्या या झाडाचं नाव पिसोनिया प्लांट आहे. त्यांना “बर्ड कॅचर” किंवा पक्षी पकडणारं झाड असेही म्हणतात. याच्या बिया लांब असतात, ज्या जाड जेलसारख्या शीटने झाकलेल्या असतात आणि खूप चिकट असतात. त्यांच्यात एक लहान हुक देखील असतं, जे जवळजवळ कोणत्याही गोष्टीला सहजपणे चिकटतं. त्यांच्या बिया मोठ्या गुच्छांमध्ये येतात. प्रत्येक गुच्छात डझनभर ते दोनशे पेक्षा जास्त बिया असू शकतात. या झाडाच्या फांद्यांवर जेव्हा पक्षी बसतो तेव्हा ही झाडं त्याच्या बिया पसरवण्यासाठी पक्ष्याच्या पिसांना चिकटून राहतात. पुढे याच कारणामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो.

पिसोनियाच्या झाडाला वर्षातून दोनदा फुलं येतात. सामान्यतः कॅरिबियन बेटांवर वाढणारी ही झाडं समुद्री पक्ष्यांसाठी घातक आहेत. जेव्हा समुद्री पक्षी घरटे बनवण्यासाठी पिसोनियाच्या फांद्यांवर बसतात आणि त्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात. पक्षी मजबूत असल्यामुळे ते उडून जातात. पण त्यांची लहान पिल्लं चिकट गुठळ्यांमध्ये अडकतात. मूठभर बियाही त्यांच्यासाठी जीवघेण्या ठरतात. त्यांना उडता येत नाही आणि ते खाली पडतात.

अनेक वेळा ते झाडांवरच मरतात. त्यांचे मृतदेह फांदीला लटकलेले दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते झाड इतकं धोकादायक असूनही अनेक समुद्री पक्षी पिसोनियाच्या झाडांना पसंत करतात. त्यावर ते घरटे बांधतात. स्वतःच्या पिल्लांना तिथे जन्म देतात. बेथ फ्लिंट, यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसमधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणतात की, पिसोनियाचे असं झाड दिसणं दुर्मिळ आहे, जिथे समुद्री पक्षी नसतील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *