मध्य प्रदेशच्या गुनामध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीने तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्या बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये तरुणीच्या दोन्ही डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती.
तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली तर दुसऱ्या डोळ्याने धूसर दिसत आहे. सध्या या तरुणीला उपचारासाठी गुनावरून ग्वोल्हेरला हलवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. प्रशासनाने आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला आणि त्याचे घर जमीनदोस्त केले.
प्रशासनाने आरोपी अयान पठानच्या घरावर बुलडोझर फिरवला. आरोपीने तरुणीचे घर मिळवण्यासाठी हे कृत्य केले आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये तरुणीने सांगितले की, ‘आरोपी अयान पठाण याने चार-पाच दिवसांपूर्वी झाडूने तिला मारहाण केली होती. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर अयानने तिच्या डोळ्यावर दगड फेकून मारला होता. अयान पठाणने तिला ओलीस ठेवले आणि महिनाभर अत्याचार केला.’
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘शारिरीक अत्याचारासोबतच आरोपी अयानने ती ओरडू नये म्हणून आरोपीने 18 एप्रिलच्या रात्री तिच्या ओठांवर फेविकॉल लावले आणि तिच्या जखमांवर मिरची पावडर लावली होती.’ आरोपीला मुलीचे घर आपल्या नावावर करायचे होते. आरोपीविरोधात आता गावकरी आक्रमक झाले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या आईने सरकारकडे केली आहे.
रविवारी प्रशासनाने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला. एसडीएम रवी मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 बाय 25 या आकाराचे हे घर सरकारी जमिनीवर बांधण्यात आले होते. कारवाईपूर्वी नोटीसही देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
पीडित मुलीवर उपचार करत असलेले नेत्रतज्ज्ञ डॉ.अभिलाष सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एका डोळ्याची लेन्स तुटली आहे. पीडितेची दृष्टी परत येईल की नाही हे पूर्ण तपासणीनंतरच सांगता येईल.’ तरुणीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली असून दुसऱ्या डोळ्याने तिला नीट दिसत देखील नाही.
दरम्यान, या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट करून कठोर शिक्षेची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘गुनाच्या मुलीवरील क्रूरतेची बातमी अस्वस्थ करणारी आहे. दोषीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून आमच्या बहिणी आणि मुलींच्या इज्जतीशी कोणताही सैतान खेळू शकणार नाही.