पती तिला मॉडर्न आणि छोटे कपडे घालायला सांगायचा,पतीने तिला सांगितलं, की त्याचे काही मित्र पत्नीची अदलाबदल करतात अन…
व्रत्तसंस्था : कौटुंबिक गुन्ह्यांची वेगवेगळी प्रकरणं अलीकडच्या काळात उघडकीस येत आहेत. सर्वसामान्य माणसं विचारही करू शकणार नाहीत, अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याने ते ज्यांच्या बाबतीत घडतात, त्यांना फार मोठा धक्का बसतो.
असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशातल्या मेरठमधल्या महिलेच्या बाबतीत घडलं आहे. मेरठमधल्या सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या महिलेचं 2019 साली दिल्लीतल्या एका तरुणाशी लग्न झालं. तो अमेरिकेत नोकरी करतो. असा आरोप आहे, की लग्नानंतर काही दिवसांतच मुलीच्या सासरकडच्या मंडळींनी दिल्लीत फ्लॅट खरेदी करण्याच्या नावाखाली हुंडा म्हणून एक कोटी रुपये मागू लागले. मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिच्यावर अत्याचार केले जाऊ लागले. 2020 साली ती पतीसह कॅलिफोर्नियात गेली.
पतीने सांगितलं होतं, की त्याने अमेरिकेत घर घेतलं आहे; मात्र तिथे गेल्यावर तिला कळलं, की तो मित्रासह भाड्याच्या घरात राहतो. त्या घराला फक्त दोनच खोल्या आहेत. पती तिला मॉडर्न आणि छोटे कपडे घालायला सांगायचा. विरोध केल्यास मारहाणही करायचा.
त्या महिलेच्या आरोपानुसार, पतीने तिला सांगितलं, की त्याचे काही मित्र पत्नीची अदलाबदल करतात (वाइफ स्वॅपिंग). त्या ग्रुपमध्ये जॉइन होण्याची इच्छा असल्याचं त्याने तिला सांगितलं. ते ऐकल्यावर तिला धक्काच बसला. काही दिवसांनी एकदा पती एका मित्राला घेऊन घरी आला. त्याला घरी सोडून तो सामान आणायला बाहेर गेला. त्यानंतर त्याच्या त्या मित्राने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पतीच्या वागण्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला आणि तिला मानसिक विकार झाला.
त्यानंतर कशीबशी ती अमेरिकेतून आपल्या माहेरी परतली. तिने अनेक दिवस मानसिक उपचार करून घेतले. तिच्या सासरच्यांनी तिची चौकशीही केली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्यांशी फोनवरून संवाद साधला, तर ते एक कोटी रुपयांच्या मागणीवर अडून बसलेले आहेत. अखेर पीडित महिलेने पती, सासरे, सासू, दीर आणि जाऊ अशा एकूण सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.