प्रेयसी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर लग्न करण्यासाठी तिच्या लहान बहिणीसोबत शरिरसंबंधाची मागणी
लखनऊ : प्रियकराने प्रेयसी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर लग्न करण्यासाठी तिच्या लहान बहिणीसोबत शरिरसंबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेडिकलची तयारी करत असताना तरुणाची मुलीसोबत ओळख झाली.
दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर शरिरसंबंधही ठेवले. तरुणीला दाखवण्यासाठी त्याने कोर्ट मॅरेज केलं. तरुणी गर्भवती झाल्यानंतर पत्नीचा दर्जा देण्यास मात्र नकार दिला. त्यासाठी त्याने पीडित तरुणीला तिच्या बहिणीसोबत शरिर संबंध ठेवायचे असल्याचं सांगितलं. तसं झालं तरच पत्नीचा दर्जा देऊन असं सांगितलं. उत्तर प्रदेशातील मैनपुरी इथल्या बरनाहल इथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तरुणीकडून लग्नासाठी तगादा लावल्यानंतर हे प्रकरण तरुणाच्या घरी पोहोचलं. तरुणाच्या घरच्यांनीही गर्भवती असणाऱ्या तरुणीचा स्वीकार करण्यास नकार दिला. त्यानंतर तरुण फरार आहे. त्याचा मोबाईल बंद असून तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तरुणीची मैत्री तीन वर्षांपूर्वी मैनपुरी इथल्या राहुल सन्नी देवल याच्याशी झाली होती.
राहुल आणि पीडित तरुणी एकमेकांशी बोलायचे. त्यांच्यात ओळख वाढली आणि प्रेम झालं. दोघांनी शरिरसबंधही ठेवले. राहुल मेडिकलची तयारी करत असून तो हॉस्टेलमध्ये राहतो. तरुणीसोबत त्याने १२ मार्चला कोर्ट मॅरेजही केलं. पण त्यानंतर त्याने खरं रुप दाखवायला सुरुवात केली. तरुणीला त्याने तिच्या लहान बहिणीला शरिरसंबंध ठेवायला सांग तरच पत्नी म्हणून स्वीकारने असं सांगितलं.
शेवटी तरुणीने ही गोष्ट कुटुंबियांना सांगितलं. तरुणी गर्भवती असून तिला तरुणाच्या कुटुंबियांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर तरुण फरार आहे. त्याचा फोनही बंद असून दोघांमध्ये कोणताच संवाद नाही. अखेर तरुणीने एसएसपी कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात आरोपी राहुल देवल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.