भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना पाकिस्तानमध्ये समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील टोबा टेक सिंग जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने आधी आपल्या बहिणीवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी फैसल याने कबुली दिली की, त्याने केवळ त्याची बहीण मारियाची हत्याच केली नाही तर तिच्यावर बलात्कारही केला. 18 मार्चच्या रात्री मारियाची हत्या केली आणि नंतर गुपचुप तिचा मृतदेह दफन केला.
या व्हिडीओने भाऊ आणि वडिलांच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला
दरम्यान, काही दिवसांनंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मारिया एका कॉटवर बेशुद्ध पडली होती आणि फैसल तिचा गळा दाबत होता. त्याच कॉटवर त्याचे वडील अब्दुल सत्तारही बसले होते. त्यांनी काम संपवणाऱ्या फैसलला पाण्याची बाटली दिली होती. व्हायरल व्हिडिओमुळे फैसल आणि अब्दुल सत्तार यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर दफन केलेला मारियाचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी काही सॅम्पल गोळा केले.
मारियाच्या दुसऱ्या भावाने साक्ष दिली
दुसरीकडे, पीडितेच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असलेला मारियाचा दुसरा भाऊ शाहबाज याने पोलिसांना सांगितले की, फैजल आणि अब्दुल सत्तार यांनी मारियाला मारण्यापूर्वी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. प्राथमिक वैद्यकीय अहवालात मारियाच्या मानेचे हाड मोडल्याचे आढळल्याने अनैसर्गिक मृत्यूची पुष्टी झाली. पोलिसांना सुरुवातीला फैसल आणि सत्तार यांची दोन दिवस चौकशी करण्याची परवानगी दिली होती.