क्राईम

घराच्या अंगणात झाडावर लटकलेल्या अवस्थेत सब इन्सपेक्टरचा मृतदेह, आत्महत्या की अनखीन काही


मुंबई : पोलीस हे कायद्याचे रक्षणकर्ते असतात. अनेक लहानमोठ्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. पोलिसांनी ठरवलं तर कुठलाही गुन्हेगार तुरुंगाबाहेर राहणार नाही असं म्हटलं जातं, एवढी पोलिसांच्या क्षमतेबाबत सर्वसामान्य नागरिकांना खात्री वाटते.

असं असलं तरी काहीवेळा वैयक्तिक अडचणींमुळे समाजाचे रक्षक असलेले पोलीसच एकदम टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक घटना केरळमधून समोर आली आहे.

केरळमधील कोच्चीमधील अंगमालीजवळ पोलीस सब इन्स्पेक्टर बाबूराज यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. बाबूराज हे 55 वर्षांचे होते. जेमतेम एका आठवड्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या पूर्वी ते स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. बाबूराज यांचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्यामुळे कोच्ची परिसरात चर्चांना उधाण आलं आहे. बाबूराज यांचा मृतदेह त्यांच्याच घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी, अशी शंका वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरी या बाबत काहीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (27 मार्च 24) बाबूराज यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. एका आठवड्यापूर्वीच त्यांना अलुवा पूर्व पोलीस स्टेशनमध्ये नवीन नियुक्ती मिळाली होती. त्या आधी ते केरळ पोलीस दलातील स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. अंगमाली पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की बाबूराज यांनी असं टोकाचं पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळी सुसाईड नोट किंवा तत्सम काहीही सापडलेले नाही. सकाळी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. पोलीस त्याच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी या घटनेची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करून या घटनेमागचं मूळ कारण शोधून काढतील. तसंच काही कटकारस्थान असेल तर त्याचाही छडा लावतील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *