ताज्या बातम्यामराठा आरक्षण

मनोज जरांगे पाटील अर्धवट दौरा सोडून घरी ! काय आहे कारण ?


मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची 24 मार्चला निर्णयाक बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती मिळत आहे.

24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल, सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. यासाठी तयारी करत असलेले मनोज जरांगे पाटील आज दौरा अर्धवट सोडून जालन्यातील घरी परतले. याचं कारण आता समोर आलं आहे.

मुलगा आजारी असल्याने परतले घरी
मनोज जरांगे पाटील आज दौरा अर्धवट सोडून अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुलीची प्रकृती बिघडली म्हणून भेटायला आलो होतो. तसेच उद्या आईचे ऑपरेशन असून भेटायला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत नाही. तोपर्यंत घरी परतणार नसल्याची शपथ जरांगे पाटील यांनी घेतली होती. गेलो तर समाजाचा आणि आलो तर तुझा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

24 मार्चला निर्णायक सभा
मनोज जरांगे पाटील म्हणाले, की 24 तारीख निर्णायक आहे. निर्णय घ्यावा लागेल. अन्याय सहन केला जाणार नाही. अन्याय झाला आहे. अधिसूचनेचा अवमान झाला असून 24 ला मिळून निर्णय करू. सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. बैठकीनंतर सरकार विचार करेल की, अंमलबजावणी करणं परवडलं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, 24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक लावली. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे.

सरकारकडून विनाकारण त्रास
मागील प्रकरणाचे आज गुन्हा दाखल करणे म्हणजे विनाकारण त्रास देणे आहे. मंडप उभारणीचे काम सुरू आहे. अन्याय सहन करणे शक्य नाही. मराठ्यांच्या एकजुटीची भीती वाटली पाहिजे. 15-16 विषयांवर चर्चा होणार आहे. गुन्हे मागे घेतले म्हणायचे आणि गुन्हे दाखल करत आहेत. गृहमंत्री झोपले होते का? अंतरवाली येथील लोकांवर दबाव आणत आहे. तुम्ही जेवढा त्रास देणार तेव्हडा लोकांचा रोष वाढणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *