क्राईममुंबई

प्रियकराच्या मदतीने चक्क पतीचाच खून,तीक्ष्ण हत्याराने वार,मृतदेह गावातून वाहणाऱ्या कालव्याजवळ फेकून दिला


मुंबई : देशात अनेक कारणांमुळे हिंसाचार होतो. यात घरगुती, प्रेमप्रकरणं, व्यभिचार, दरोडा अशा काही प्रमुख कारणांचा समावेश आहे. अशाच एका गुन्ह्यात आरोपी महिलेने प्रियकराच्या मदतीने चक्क पतीचाच खून केला.

तीक्ष्ण हत्याराने वार करून तिने पतीला संपवलं. प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. कारण त्याच प्रेमापोटी माणसं एकमेकांसाठी जीव द्यायला आणि दुसऱ्याचा जीव घ्यायला मागे-पुढे पाहत नाहीत. लुधियानामध्ये एका महिलेने प्रियकरावरच्या प्रेमासाठी नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह गावातून वाहणाऱ्या कालव्याजवळ फेकून दिला. मृतदेह पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली, तेव्हा डेहलो पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
किला रायपूरचा रहिवासी असलेला हरजितसिंग अशी मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. त्याचा भाऊ बलविंदरसिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरजितची पत्नी हरविंदर कौर उर्फ मनी, तिचा प्रियकर साजिद आलम आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांवर खुनाच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
बलविंदरसिंग यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हरजितसिंग त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. आरोपी साजिद आलम मूळ बंगालचा रहिवासी असून, तो हरजितबरोबर विटभट्टीवर काम करायचा. गेल्या पाच वर्षांपासून ते एकत्र असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. हरजितने साजिदला त्याच्याच घरात राहायला जागा दिली होती, मात्र साजिदने त्याची बायको हरविंदर कौर हिच्याशी अनैतिक संबंध ठेवले आणि मित्राची फसवणूक केली.
मित्र व पत्नीच्या संबंधांबाबत हरजितला समजलं होतं. त्यामुळे दोघा मित्रांचे संबंध ताणले गेले होते. पत्नी हरविंदरशीही हरजितचं नेहमी भांडण होत होतं. त्यामुळे हरविंदरने प्रियकर साजिदसोबत हरजितच्या खुनाचा कट केला. दोन अज्ञात साथीदारांच्या मदतीने त्यांनी हरजितवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला ठार मारलं. मग त्याचा मृतदेह नीलो कला इथं जाणाऱ्या रस्त्यावरील खानपूर गावाजवळ कालव्याच्या काठावर फेकून दिला. हरजितला मारल्यानंतर सगळे आरोपी फरार असल्याचं पोलीस इन्स्पेक्टर रवींद्र कुमार यांनी सांगितलं


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *