ताज्या बातम्या

राम मंदिरातून आरतीचे थेट प्रक्षेपण भाविकांना दररोज घरी बसल्या पाहता येणार


अयोध्येतील राम मंदिर २२ जानेवारापासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. यानंतर दररोज हजारो लोकं दर्शनसाठी अयोध्येत जगभरातून येत आहेत. राम मंदिरात विराजमान झालेल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्त व्याकुळ झाले आहेत.

त्यातच आता राममंदिर ट्रस्टतर्फे रामललाच्या भक्तांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राम मंदिरातून आरतीचे थेट प्रक्षेपण भाविकांना दररोज घरी बसल्या पाहता येणार आहे. त्यामुळे लाखो भाविकांमध्ये आता उत्साहाचे वातावरण आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह आरती

दूरदर्शन दररोज सकाळी ६.१५ वाजता अयोध्येतील राम मंदिरातून होणारी रोजची आरती थेट प्रसारित केली जाणार आहे. 22 जानेवारीपासून आजपर्यंत लाखो लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. मंदिर उघडताच रामललाच्या दरबारातील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रामललाच्या दरबारात येऊन आरतीला हजेरी लावता यावी म्हणून अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच आरतीसाठी पासची व्यवस्था ट्रस्टने सुरू केली होती.

शृंगार, भोग आणि शयन आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी ट्रस्टकडून पास जारी केले जात आहेत. आता सकाळी 6.15 वाजता होणाऱ्या रामललाच्या शृंगार आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे. दूरदर्शनने मंगळवारी पहिल्या दिवशी त्याची चाचणी घेतली. बुधवारपासून दैनंदिन थेट प्रक्षेपण सुविधा सुरळीत सुरू झाली. 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यापासून सुमारे 75 लाख भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले आहे.

राम मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, राम लल्लाच्या शृंगार आरतीचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनने सुरू केले आहे. लवकरच रामललाच्या संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्थाही सुरू करण्यात येणार आहे.

करोडो रुपयांचे दान

रामलल्ला विराजमान झाल्यापासून आतापर्यंत करोडो रुपयांचे दान राम मंदिरात आले आहे. भक्त मोठ्या मनाने मंदिरात दान करत आहे. सोन्या चांदीचे वस्तू देखील दानमध्ये आल्या आहेत. रामलल्लासाठी अनेक मोठ्या वस्तू दान करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत करोडो रुपये दान स्वरुपात आले असून मंदिरात मोठ्या हुंड्या लावण्यात आल्या आहेत.

बँक कर्मचारी आणि ट्रस्टचे अधिकारी यांच्या देखरेखीखाली या दानपेटीत आलेल्या दानची मोजणी केली जाते. त्यानंतर हे पैसे थेट स्टेट बँकेत जमा केले जातात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *